शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
2
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
3
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
6
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
7
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
8
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
9
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
10
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
11
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
12
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
13
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
14
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
15
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
16
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
17
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
19
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
20
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
Daily Top 2Weekly Top 5

'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:26 IST

"8.70 लाख मेट्रो तिकिटे विकली गेली. यावरून जवळपास ८ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत, असा अंदाज आहे..."

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी मोठा दावा केला आहे. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूच्या विजयोत्सवासाठी जवळपास 8 लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचले होते. यामुळे तेथे मोठी गर्दी होऊन बुधवारी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले आहेत. परमेश्वर म्हणाले, "आम्ही विधान सौधाबाहेर (विधानसभा) एक लाख लोक आणि स्टेडियमबाहेर 25,000 कोल असतील असा अंदाज बांधला होता. मात्र आम्हाला 2.5 लाख लोकांचीही अपेक्षा नव्हती. 8.70 लाख मेट्रो तिकिटे विकली गेली. यावरून जवळपास ८ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत, असा अंदाज आहे."

13 वर्षांच्या मुलीसह सर्व मृत 40 वर्षांहून कमी वयाचे -या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून यात अधिकांश तरुणच होते. मृतांमध्ये 13 वर्षीय दिव्यांशी, 17 वर्षीय शिवलिंगा, 19 वर्षीय चिन्मयी, 20 वर्षीय भूमी आणि प्रज्वल, 25 वर्षीय साहना, 27 वर्षीय अक्षता, 29 वर्षीय देवी, 32 वर्षीय डोरेशा आणि 33 वर्षीय मनोज यांचा समावेश आहे. हे सर्व लोक बंगळुरू आणि जवळपासच्या जिल्ह्यातून RCB च्या पहिल्या विजयाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी पोहोचले होते.

फ्री पासच्या घोषणेमुळे वाढली गर्दी -आरसीबीने बुधवारी दुपारी साधारणपणे 3:14 वाजता सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोफत पास उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर स्टेडियमजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली. प्रवेशासाठी कुठळ्याही प्रकारचा स्पष्ट प्रोटोकॉल नसल्याने आणि तिकट नियंत्रण नसल्याने हजारो लोकांनी एकाचवेळी कार्यक्रमस स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनेकांनी बॅरिकेड्स आणि गेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केला, यावेळी काही लोक पडून गर्दीखाली चिरडले गेले.

विधान सौधा येथे व्यस्त होते पोलीस -गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल आरसीबी संघाला विधान सौधा येथे भेटणार होते. यामुळे तेथील सुरक्षिततेसाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. यामुळे, स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात पोलिसांची कमतरता होती. परिणामी गर्दी नियंत्रित करणे अशक्य झाले.

टॅग्स :Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरKarnatakकर्नाटकDeathमृत्यूcongressकाँग्रेसPoliceपोलिस