शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मोठ्या पॅकेजचं आगार; भारतातल्या 'या' शहरात मिळतो सर्वाधिक पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:37 IST

नेटवर्किंग, सॉफ्टवेयर आणि आयटी कंपन्यांमध्ये सर्वात जास्त रकमेचं पॅकेज

बंगळुरु: कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या शहरांच्या यादीत बंगळुरु अव्वल आहे. तर सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रांमध्ये नेटवर्किंग, सॉफ्टवेयर आणि आयटी या तीन क्षेत्रांचा क्रमांक वरचा आहे. लिंक्डइननं देशात पहिल्यांदाच पगाराचे आकडे लक्षात घेऊन याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे. जगातील ५ कोटी लोक लिंक्डइनशी जोडले गेलेले आहेत. यातील सर्वाधिक लोक अमेरिकेतील आहेत. मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र लिंक्डइनच्या सर्वेक्षणानं हा समज खोटा ठरला आहे. या सर्वेक्षणासाठी लिंक्डइननं गेल्या दोन महिन्यांपासून आकडेवारी गोळा केली. यामधून बंगळुरु शहरात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. देशाचं आयटी हब अशी ओळख असलेल्या बंगळुरुत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो. यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. बंगळुरु शहरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या पॅकेजची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. इथल्या कंपन्या एका कर्मचाऱ्याला वार्षिक सरासरी ११.६७ लाख रुपयांचं पॅकेज देतात. यानंतर मुंबई (९.०३ लाख रुपये) दुसऱ्या, तर दिल्ली-एनसीआर (८.९९ लाख रुपये) स्थानावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर हैदराबाद (८.४५ लाख रुपये) आणि पाचव्या स्थानावर चेन्नई (६.३० लाख रुपये) आहे. सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रात हार्डवेयर आणि नेटवर्किंग कंपन्या आघाडीवर आहेत. याशिवाय सॉफ्टवेयर, आयटी कंपन्यादेखील कंपन्यांना भरघोस पगार देतात. 

टॅग्स :jobनोकरीITमाहिती तंत्रज्ञानBengaluruबेंगळूरMumbaiमुंबईdelhiदिल्लीChennaiचेन्नई