हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद, कन्नड शिकायचं नसेल तर...; कर्नाटकात भाषावाद उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:08 IST2025-01-25T18:05:44+5:302025-01-25T18:08:11+5:30

जे भाषा, संस्कृतीचा सन्मान करत नसतील त्यांची बंगळुरूला आवश्यकता नाही असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Bengaluru is closed for north India and neighbouring states who doesn't want to learn Kannada, post is viral | हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद, कन्नड शिकायचं नसेल तर...; कर्नाटकात भाषावाद उफाळला

हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद, कन्नड शिकायचं नसेल तर...; कर्नाटकात भाषावाद उफाळला

बंगळुरू - कर्नाटकात सध्या भाषिक वाद उफाळून आला असून बंगळुरूत बहुभाषिक लोक राहतात. तिथे स्थानिकांनी परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांना कन्नड भाषा शिकण्याचा सल्ला दिला आहे. ही प्रादेशिक संस्कृतीचा सन्मान करण्यासारखं आहे असं सांगितले. त्यातून एका ट्विटर युजरने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या ट्विटर पोस्टवर म्हटलंय की, बंगळुरू उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकायचं नाही या पोस्टवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पोस्टमध्ये युजरने जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणार नसतील त्यांनी बंगळुरूत येऊ नये. बंगळुरू उत्तर भारत आणि इतर राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकण्याची गरज वाटत नाही. जे भाषा, संस्कृतीचा सन्मान करत नसतील त्यांची बंगळुरूला आवश्यकता नाही असं म्हटलं आहे.

ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून १ लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहचली आहे. त्यावर ७०० हून अधिक कमेंट्स आल्यात. काही युजर्स या पोस्टशी सहमत आहेत तर काहींनी त्याला विरोध केला. एकाने यावर टीका करत दुसरी भाषा शिकणे ही व्यक्तिगत आवड असू शकते आणि कुणी एखाद्यावर थोपवू शकत नाही असं म्हटलं. तर दुसऱ्याने मी या पोस्टशी सहमत आहे. परंतु सरकारने बंगळुरू काम करणाऱ्यांसाठी भाषा येणे बंधनकारक केले पाहिजे, जमावाने न्याय करणे त्यावर समाधानकारक तोडगा असू शकत नाही असं सांगितले.

दरम्यान, एका युजरने त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंगळुरू आज दुसऱ्या राज्यातील मेहनती लोकांमुळे अस्तित्वात आहे. ज्यांचे तिथल्या विकासात योगदान आहे हे विसरू नका. आता जेव्हा इथं सर्वकाही बनले आहे तेव्हा तुम्हाला दुसऱ्या लोकांनी इथून निघून जावं असं वाटते का...कन्नड लोक आणि कर्नाटक सरकारची लाज वाटते जे चूपचाप हे पाहतंय असं त्याने म्हटलं. 
 

Web Title: Bengaluru is closed for north India and neighbouring states who doesn't want to learn Kannada, post is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.