भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. नबीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
पक्ष मुख्यालयात नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नबीन म्हणाले, "आज माझ्यासाठी संकल्पाचा क्षण आहे. आज मी फक्त पद स्वीकारत नाही. मी या पक्षाच्या विचारसरणी, परंपरा आणि राष्ट्रवादी चळवळीची जबाबदारी स्वीकारत आहे आणि या प्रसंगी, मी माझ्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांनाही आदरांजली वाहतो. आज १.४ अब्ज भारतीय विकसित भारताच्या स्वप्नाशी स्वतःला जोडत आहेत आणि देशाला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. यासाठी मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो, असंही ते म्हणाले.
नबीन म्हणाले की, पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यामुळे त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळाली. गुजरातमधील आणंद येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांशी झालेल्या पहिल्या संभाषणाची आठवण करून देत नबीन म्हणाले की, त्यांना कळले की खरी महानता लोकांच्या भावनांशी जोडल्याने येते.
नबीन म्हणाले, "आज, सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षातील या सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी दिली आहे आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर नतमस्तक आहे. पंतप्रधान, मी तुमचे मनापासून आभार मानतो कारण, सामान्य कार्यकर्ते म्हणून, तुम्ही देशाची सेवा करण्यासाठी कसे अथक परिश्रम करता हे आम्ही नेहमीच दूरवरून पाहिले आहे."
"मला आठवतंय की मी पहिल्यांदा तुमच्यासोबत गुजरातमधील आणंद येथे एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो आणि सद्भावना मिशन कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकताना पाहिले होते. आणि कार्यक्रम संपल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रीन रूममध्ये आमच्याशी बोललात, तेव्हा तुम्ही गुजरातमधून इतके लोक का आले आहेत हे खूप भावनिकतेने स्पष्ट केले. त्या दिवशी मला समजले की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला लोकांच्या भावनांशी जोडते तेव्हा ती महान बनते, असंही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले.
नितीन नबीन निवडणुकीच्या मूडमध्ये
नबीन यांनी तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरी येथील आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भवितव्यावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे पाचही राज्यांमध्ये यश मिळेल.
नबीन म्हणाले, "पुढील काही महिन्यांत तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरी येथे निवडणुका होणार आहेत आणि या राज्यांच्या लोकसंख्याशास्त्राची व्यापक चर्चा होत आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रामुळे तेथील परिस्थिती बदलत आहे आणि हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या संघर्ष आणि कठोर परिश्रमातून भाजप कार्यकर्ते पाचही राज्यांमध्ये यश मिळवतील.
Web Summary : Nitin Nabin assumes BJP presidency, vowing to win upcoming elections in Tamil Nadu, Assam, West Bengal, Kerala, and Puducherry. He expressed gratitude to PM Modi and party workers, emphasizing the importance of connecting with people.
Web Summary : नितिन नवीन ने भाजपा अध्यक्ष पद संभाला, तमिलनाडु, असम, पश्चिम बंगाल, केरल और पुदुचेरी में आगामी चुनाव जीतने का संकल्प लिया। उन्होंने पीएम मोदी और कार्यकर्ताओं के प्रति आभार व्यक्त किया, लोगों से जुड़ने के महत्व पर जोर दिया।