शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"बंगालमध्ये TMC चा अंत होणार, लवकरच भाजपाचं सरकार"; भाजपा नेत्याची ममता बॅनर्जींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:15 IST

Dilip Ghosh And Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपा नेते दिलीप घोष यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपा नेते दिलीप घोष यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता बंगालमध्ये टीएमसीचा (TMC) अंत होणार असून लवकरच भाजपाचे सरकार सत्तेत येईल असं म्हणत निशाणा साधला. दिलीप घोष यांनी असा दावा केला की, एप्रिलनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होत आहे आणि ही बाब ममता बॅनर्जी यांनाही समजली आहे. म्हणूनच त्या एकामागून एक बैठका घेत आहेत, पण या बैठकांचा काहीही उपयोग होणार नाही. टीएमसीचं खरं रूप आता जनतेसमोर आलं असून जनता त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी सज्ज झाली आहे.

दिलीप घोष पुढे म्हणाले की, दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाणूनबुजून गदारोळ करत आहेत. ममता बॅनर्जी कशा प्रकारे सत्ता चालवत आहेत हे आता संपूर्ण देश पाहत आहे. बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये येऊन इथलं वातावरण खराब करत आहेत, ज्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. ममता बॅनर्जींच्या हातातून आता सर्व काही निसटलं आहे. बंगालची सध्याची परिस्थिती काय आहे, हे आज संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. टीएमसीचे नेते फक्त स्वतःचे खिसे भरण्यात मग्न आहेत आणि जनतेच्या समस्या ऐकायला कोणालाही वेळ नाही. लोक जेव्हा तक्रार घेऊन पोलिसांकडे जातात, तेव्हा पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.

सोमवारी ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी आयुक्तांवर कडक शब्दांत टीका केली. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी सात वेळा खासदार आणि चार वेळा केंद्रीय मंत्री राहिले आहे, पण मी असा मुख्य निवडणूक आयुक्त कधीच पाहिला नाही. ते अत्यंत अहंकारी आणि खोटे बोलणारे व्यक्ती आहेत."

ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितलं की, "मी त्यांना स्पष्टपणे बजावलं आहे की, कोणीही कायमस्वरूपी खुर्चीवर बसून राहू शकत नाही, प्रत्येकाला कधी ना कधी जावंच लागतं." तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान (IT) विभागाच्या महासंचालिका सीमा खन्ना यांच्यावरही निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील खऱ्या मतदारांची नावे यादीतून हटवण्यात त्यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader Predicts TMC's End, BJP Government in Bengal Soon

Web Summary : BJP's Dilip Ghosh predicts TMC's downfall in Bengal, claiming a BJP government will soon rise. He criticizes Mamata Banerjee's Delhi visits as futile, alleging her government is failing and prioritizing personal gain over public welfare amidst rising concerns about infiltrators.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण