शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 9:53 AM

ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी मतदान पार पडले. मात्र, पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि दार्जिलिंग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शंकर मलाकार यांनी सांगितले की, पोलीस ग्राऊंडवर 14 एप्रिलला राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी याला परवानगी नाकारली आहे. परिणामी राहुल गांधी यांची सिलीगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागली आहे. सिलिगुडीचे पोलीस आयुक्त बी.एल. मीणा यांनीही राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,' आम्ही त्या ग्राऊंडवर परवानगी नाकरली आहे. काही नियम आहेत, त्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, याशिवाय त्यांना दुसरा पर्याय आणला नव्हता.'

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली होती. परिणामी त्यांनाही जाहीर सभा रद्द करावी लागली होती. सभा रद्द झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सभेला जमलेल्या लोकांना चक्क फोनवरून संबोधित केले होते. यापूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरलादेखील ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली नव्हती.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019