शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:16 IST

Mamata Banerjee vs BJP: "मी कधीही कुणाला डिवचत नाही, पण मला त्रास दिला तर मी सोडणार नाही"

Mamata Banerjee vs BJP: पश्चिम बंगालमध्ये I-PAC कार्यालयावर ईडीने छापा टाकला. या छाप्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे पक्षाच्या नेत्यांसोबत एक रॅली काढली. ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आयोजित या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "मी केंद्र सरकारला आणि भाजपला आव्हान देते की तुम्ही माझ्याशी नीट वागा. भाजप हे हरयाणा आणि बिहारमध्ये बळजबरीने सत्तेत आले आहेत. काही इतर राज्यातही ते हा पॅटर्न राबवताना दिसत आहेत. आता तर बंगालमध्येही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. घोटाळ्याचे पैसे कोणी वापरले ते मला विचारा."

जर मला कुणी दुखावलं तर मी त्याला सोडत नाही!

"मी कधीही कुणाला डिवचत नाही, कुणालाही त्रास द्यायला जात नाही. पण जर कोणी मला दुखावले तर मी त्यांना सोडत नाही. SIR च्या नावाखाली भाजपचे लोक स्थानिक लोकांना लक्ष्य करतात. ते वृद्धांना आणि गर्भवती महिलांनाही त्रास देतात. जर तुम्ही बंगाली बोललात तर ते तुम्हाला बांगलादेशी घोषित करतात. बंगालमध्ये रोहिंग्या आहेत, पण ते कुठे आहेत? जर आसाममध्ये रोहिंग्या नाहीत, तर तिथे एसआयआर का सुरू केला गेला नाही? हे सर्व केले जात आहे कारण ते महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये जसे केले होते. तसेच बंगालमध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य नाही," असे ममतदीदींनी खडसावले.

जर मी तोंड उघडलं तर...

"आम्ही सध्या भाजपशी कठोरतेने वागत आहोत. संघर्ष करायचाच असेल तर आम्ही शक्य ते सर्वकाही करू. जर मी तोंड उघडले तर संपूर्ण देश हादरून जाईल. काही विशेष प्रकारचे निधी कुणाला मिळतात हे आम्हाला माहितीये. जर मी याबद्दल बोलले तर संपूर्ण देश हादरेल. माझ्याकडे सर्व माहिती आहे. जर मी तोंड उघडले तर अनेक लोक अडचणीत येतील. जर तुम्ही हल्ला केला तर मी प्रत्युत्तर देईन. मला प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहित आहे. भाजपचा निर्णय सार्वजनिक व्यासपीठावर घेतला जाईल. तुम्ही कुठे निवडणूक लढवता ते मला पहायचे आहे," असा थेट इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee warns BJP: 'If I speak, the whole country...'

Web Summary : Mamata Banerjee challenged BJP after ED raided an I-PAC office in West Bengal. She accused the BJP of trying to seize power in Bengal like they did in other states. Banerjee warned that if she spoke out, the entire country would be shaken.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2026BJPभाजपा