शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बेळगावचे तहसीलदार मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद?, कुटुंबीयांनी केली तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 12:49 IST

घातपाताचा संशय

बेळगाव : बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बेळगावच्या प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे बुधवारी (दि. २८ जून) मध्यरात्री निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला नसून संशयास्पदरीत्या झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने केली आहे. याबाबत कॅम्प पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.अशोक मण्णीकेरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. मण्णीकेरी यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाइकांनी आणि समर्थकांनी कॅम्प पोलिस स्थानकासमोर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान मण्णीकेरी यांचे मेव्हणे आणि पत्नीवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. मण्णीकेरी यांची मोठी बहीण गिरीजा यांनी अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार नोंदविली असून घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पोलिस तपासाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.अशोक मण्णीकेरी हे मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित होते. बेळगाव शहरात महसूल खात्यासंदर्भातील विविध अडीअडचणीत त्यांनी अनेकांना मदत केली आहे. शहरातील विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावDeathमृत्यू