बेळगाव सीमाप्रश्नासंबंधी ठराव नाही

By Admin | Updated: August 20, 2014 01:51 IST2014-08-20T01:51:46+5:302014-08-20T01:51:46+5:30

मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत मंगळवारी सीमाप्रश्नासंबंधी ठराव झालाच नाही.

Belgaon border question resolution is not there | बेळगाव सीमाप्रश्नासंबंधी ठराव नाही

बेळगाव सीमाप्रश्नासंबंधी ठराव नाही

 बेळगाव : मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत मंगळवारी सीमाप्रश्नासंबंधी ठराव झालाच नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सीमाप्रश्नासंबंधी ठराव करण्याची 1956 पासूनची परंपरा मराठी भाषिकांचे वर्चस्व असूनही खंडित झाली. अध्यक्षस्थानी महापौर महेश नाईक होते.

सीमाप्रश्नासंबंधी ठराव केल्यास कर्नाटक सरकार महापालिका बरखास्त करील, या भीतीपोटीच सीमाप्रश्नासंबंधी ठराव मांडला गेला नाही. महापालिकेत मराठी भाषिक 32, कन्नड भाषिक 18 आणि 
उर्दू भाषिक आठ नगरसेवक 
आहेत. येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचाही बैठकीत निषेध करण्यात आला नाही.  
महापौरपदी महेश नाईक आणि उपमहापौरपदी रेणू मुतगेकर या
 मराठी भाषिकांची निवड झाल्यामुळे पालिकेच्या पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नासंबंधी ठराव केला 
जाईल, असेच मराठी भाषिकांना वाटत होते.

Web Title: Belgaon border question resolution is not there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.