मनाची श्रीमंती! भिकार्‍याने 100 कुटुंबांना दिले महिन्याभराचे रेशन अन् 3000 मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:34 AM2020-05-19T10:34:25+5:302020-05-19T10:38:29+5:30

अन्नधान्यावाचून हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क भिकाऱ्यानं महिन्याभराचे धान्य पुरवलं आहे.

The beggar gave 100 families a month's ration and 3000 masks vrd | मनाची श्रीमंती! भिकार्‍याने 100 कुटुंबांना दिले महिन्याभराचे रेशन अन् 3000 मास्क

मनाची श्रीमंती! भिकार्‍याने 100 कुटुंबांना दिले महिन्याभराचे रेशन अन् 3000 मास्क

googlenewsNext
ठळक मुद्देजगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत असतानाही त्याला म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही.अन्नधान्यावाचून हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क भिकाऱ्यानं महिन्याभराचे धान्य पुरवलं आहे.

नवी दिल्ली- जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत असतानाही त्याला म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. अन्नधान्यावाचून हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क भिकाऱ्यानं महिन्याभराचे धान्य पुरवलं आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये असा भिकारी आहे, जो कोरोना योद्धा म्हणून समोर आला आहे. भीक मागून जगणार्‍या दिव्यांग राजूनेही असेच एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. जे नेहमीच लक्षात राहील. राजूने आतापर्यंत 100 गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन आणि 3000 मास्क दिले आहेत. 

राजू ट्रिसायकलमधून फिरतो आणि दिवसभर भीक मागतो. भीक मागून जमवलेल्या त्याच पैशातून तो लोकांना मदत करतो. राजूने आपल्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून अनेक गरीब मुलींचं लग्न करून दिलं आहे. राजू म्हणतो की, दिवसभरात जे काही पैसे मिळतात, तो आवश्यकतेनुसार खर्च करतो, उरलेला पैसा जमा करून ठेवतो आणि गरजू लोकांमध्ये त्याचं वाटप करतो. पठाणकोटमधील धनगू रोडवरील रस्त्याकडे जाणारा पूल तुटला होता. ज्यामुळे लोकांना त्रास होत होता. लोकांनी प्रशासनाकडे बर्‍याचदा तक्रारी केल्या. पण राजूने त्याच्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून तो पूल दुरुस्त केला. त्याची आता पंजाबमध्ये चर्चा आहे. राजूला त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीच दूर लोटण्याचं त्याला दुःख आहे. म्हणूनच जर मी काही चांगले कार्य केले, तर कदाचित शेवटच्या क्षणी माझ्या पार्थिवदेहाला खांदा देण्यासाठी तर चार लोक मिळतील. नाहीतर  भिकारी जमिनीवर जगतात आणि जमिनीवरच मरतात. त्यांच्या मृतदेहाला कोणी खांदा देणाराही सापडत नाही. 

तसेच राजू गरीब मुलांच्या शाळेची फीसुद्धा भरतो आणि आतापर्यंत त्यानं 22 गरीब मुलीचं लग्न लावून दिलं आहे. तो भंडारा भरवतो, उन्हाळ्यात लोकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करतो. कोरोना विषाणूमुळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे, पण राजू भिकारी हे काम करीत आहे, जे कोणीही कधीही विसरणार नाही.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक

CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

Web Title: The beggar gave 100 families a month's ration and 3000 masks vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.