Science News: विज्ञानही झुकले! वयाच्या 70 व्या वर्षी बनली आई; गुजरातच्या दांम्पत्याला 45 वर्षांनी मुल झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:14 IST2021-10-19T19:12:35+5:302021-10-19T19:14:59+5:30
IVF Success Story in Gujrat: जीवूबेन या जगातील सर्वात वयस्कर माता असल्याचा दावा केला आहे. 2009 मध्ये जगातील सर्वात वयस्कर माता बनण्याचे रेकॉर्ड युरोपच्या एलिजाबेथ एडिनीच्या नावे होते.

Science News: विज्ञानही झुकले! वयाच्या 70 व्या वर्षी बनली आई; गुजरातच्या दांम्पत्याला 45 वर्षांनी मुल झाले
अहमदाबाद : आई होणे हे सर्व महिलांसाठी भाग्याचे असते. अनेकांना व्यंधत्व किंवा अन्य काही कारणांमुळे मूल होत नाही. यामुळे समाजातून, घरातून त्यांना टोमणे ऐकावे लागतात. गुजरातमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एका 70 वर्षीय महिलेची 45 वर्षांपासून आई होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. जगातील सर्वाधिक वयात ती आई झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
70 वर्षीय जीवूबेन राबरीने 45 वर्षांनी मुलाला जन्म दिला आहे. वाचून आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे. गुजरातमध्ये सध्या जीवूबेन आणि तिचा पती मालधारी (75) हे चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा मुलगा दाखविला आहे. दांम्पत्याने आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिला आहे. ते कच्छच्या छोट्याशा गावात मोरामध्ये राहणारे आहेत. एवढ्या वर्षांनी पाळणा हलल्याने कुटुंब आणि नातेवाईकांत आनंदाचे वातावरण आहे. माता आणि मुलगा दोन्ही स्वस्थ आहेत.
जीवूबेन आणि मालधारी यांचे लग्न 45 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, त्यांना मूल झाले नव्हते. आयव्हीएफ करणारे डॉ. नरेश भानुशाली यांनी त्यांना या वयात आयव्हीएफद्वारे मूल जन्माला घालण्यातील अडचणी, धोके सांगितले होते. मुलाला जन्म देणे कठीण असल्याचे म्हटले होते. मात्र, दांम्पत्याने विज्ञानावर विश्वास ठेवला आणि अशक्य गोष्ट शक्य केली.
जगातील सर्वात वयस्कर माता...
जीवूबेन या जगातील सर्वात वयस्कर माता असल्याचा दावा केला आहे. 2009 मध्ये जगातील सर्वात वयस्कर माता बनण्याचे रेकॉर्ड युरोपच्या एलिजाबेथ एडिनीच्या नावे होते. तिने 50 वर्षांपेक्षा जास्त वयात मुलाला जन्म दिला होता. युकेमध्ये 50 पेक्षा जास्त वयात आयव्हीएफ करण्यावर बंदी होती. यामुळे तिला युक्रेनला जावे लागले होते.