मारहाण करून नदीत ढकलून दिले

By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:23+5:302015-07-31T23:03:23+5:30

Beat them and push them into the river | मारहाण करून नदीत ढकलून दिले

मारहाण करून नदीत ढकलून दिले

>संशयिताला अटक


मडगाव : मारहाण करून नदीत ढकलून दिल्याची घटना कुटबण जेटीवर गुरुवारी घडली. भक्ती बारला (38) हा पाण्यात बुडाल्यानंतर गायब झाला असून त्याचा शोध चालू आहे, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. मूळ ओडिशा येथील मिथुन सारथी (27) याला अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
निकोलास बारला हे तक्रारदार आहेत. गुरुवार 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. मिथुन सारथी याने आपला मोठा भाऊ भक्ती बारला याच्याशी भांडण करून त्याला मारहाण केली व त्याला नदीत ढकलून दिले, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. संशयित व तक्रारदार हे दोघेही ओडिशा येथील असून कुटबण जेटीवर ते मासेमारी ट्रॉलर्सवर काम करतात. भादंसंच्या 308 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Beat them and push them into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.