शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; तब्बल 10 लाख रुपयांपर्यत मिळवा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 10:46 IST

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग

ठळक मुद्देउत्पादकांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना पुरवठा साखळीशी जोडणे, तसेच अन्न-प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

मुंबई : केंद्र शासनानाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी पाच वर्षांत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे ही योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादकांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना पुरवठा साखळीशी जोडणे, तसेच अन्न-प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

यांना घेता येईल लाभnप्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांना सार्वजनिक सोयी-सुविधा केंद्र, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजिस, भांडवल गुंतवणूककरिता खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे. nमार्केटिंग व ब्रँडिंग या घटकांकरिता एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. स्वयंसाहाय्यता गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीकरिता (बियाणे भांडवल) ४ लाख रुपये प्रती बचतगट एवढा लाभ दिला जाणार आहे. nया गटातील कमाल १० सदस्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये बियाणे भांडवल म्हणून देण्यात येणार आहे.

मुंबईत किती जणांना मिळेल लाभ? ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजने’अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी समिती स्थापन केली जाते. सर्व निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र अर्जदारांना प्रत्यक्ष लाभ दिला जातो. मुंबई परिक्षेत्रात २०२१-२२ या वर्षाकरिता एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

असा करा अर्जया योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावयाची आहे. शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसाहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांना ऑफलाइन अर्ज सादर करायचे असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी लागेल. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानbusinessव्यवसाय