शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तयार राहा...सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा समोर येणार; संजय राऊतांचा थेट लडाखमधून एल्गार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:22 IST

किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का?

मुंबई-

किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का? सोमय्यांनी काय मोठे दिवे लावलेत का? अशा कठोर शब्दात टीका करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यात परतल्यानंतर किरीट सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं विधान केलं आहे. संजय राऊत सध्या लडाखमध्ये असून एपीबी माझा वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सोमय्यांवर थेट लडाखमधून हल्लाबोल केला आहे. 

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक

"तुम्ही तोंडाला येईल ते बोलायचं. तुम्ही बकबक करायची आणि तुमच्या बकबकीला आम्ही उत्तर द्यायचं. कोण किरीट सोमय्या? अब्रुनुकसानीचा दावा केला म्हणजे त्यांनी काय मोठे दिवे लावले? हे काहीच नाहीय. मी इथून निघाल्यावर किरीट सोमय्याच्या फ्रॉडचं मोठं प्रकरण मुंबईत गेल्यावर सांगेन. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे मुखवटे लावून खंडणी गोळा करणारे हे लोक आहेत", असं संजय राऊत म्हणाले. 

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊतांनी आजवर किरीट सोमय्यांवर विविध आरोप करत त्यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठान संबंधिचे घोटाळे उघड केले आहेत. त्यांनी सोमय्यांविरोधात आरोपींची मालिकाच सुरू केली आहे. आता मुंबईत परतल्यानंतर ते कोणता नवा आरोप करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

बृजभूषण सिंह लढवय्या माणूससंजय राऊत यांनी यावेळी भाजपाचे खासदार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह यांचंही कौतुक केलं. "बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं", अशा शब्दात राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा