हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून बहिणीने मारली नदीत उडी, वाचवण्यासाठी आईही गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:08 IST2024-07-31T18:08:31+5:302024-07-31T18:08:53+5:30
विक्रमला बुडताना पाहून आई उर्मिला आणि २५ वर्षीय विवाहित बहीण मोहिनी यांनी विक्रमला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली.

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून बहिणीने मारली नदीत उडी, वाचवण्यासाठी आईही गेली अन्...
मध्य प्रदेशच्या खरगोनमधील पर्यटननगरी असलेल्या महेश्वरमध्ये नर्मदा नदीत अंघोळ करताना मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाला बुडताना पाहून आई आणि मुलीने देखील त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. यामध्ये नदीत बुडून तिघांचाही मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेने शोककळा पसरली आहे.खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या महेश्वरमधील नर्मदा नदीच्या पेशवे घाटावर ही घटना घडली. इंदूरचे राजपूत कुटुंब नदीत स्नान करण्यासाठी आले होते. अंघोळ करत असताना १८ वर्षीय मुलगा विक्रम नर्मदा नदीत बुडू लागला.
विक्रमला बुडताना पाहून आई उर्मिला आणि २५ वर्षीय विवाहित बहीण मोहिनी यांनी विक्रमला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. विक्रमला वाचवण्याच्या प्रयत्नात आई उर्मिला आणि बहीण मोहिनी यांचा बुडून मृत्यू झाला. नदीत शोध घेत असताना उर्मिला आणि मोहिनी या दोघींचे मृतदेह सापडले.
एसडीएम अनिल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील अरविंदो हॉस्पिटलजवळ राहणारं राजपूत कुटुंब महेश्वर हे ठिकाण फिरण्यासाठी आलं होतं. येथे अंघोळ करण्यासाठी पेशवे घाट येथे आले. येथे अंघोळ करताना महिला आणि तिच्या विवाहित मुलीचा मृत्यू झाला. तसेच विक्रमचाही बुडून मृत्यू झाला.