शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

५ रुपयांचा केक ठरला जीवघेणा! काही मिनिटांतच तरुणाचा मृत्यू; ३ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:33 IST

गावातील दुकानातून विकत घेतलेला केक खाल्ल्याने एका कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील दुकानातून विकत घेतलेला केक खाल्ल्याने एका कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. केक खाल्ल्यानंतर काही वेळातच तरुण आणि लहान मुलाची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून, चिमुकला सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुआडाबर गावात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गावातील अमन सिंह या तरुणाने शनिवारी संध्याकाळी स्थानिक किराणा दुकानातून ५-५ रुपयांचे दोन केक विकत घेतले होते. अमनने स्वतः एक केक खाल्ला आणि शेजारी राहणाऱ्या ३ वर्षीय ओमकारलाही केकचा तुकडा खायला दिला.

१८ वर्षीय अमन सिंहचा मृत्यू 

केक खाल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दोघांच्याही पोटात खूप वेदना होऊ लागल्या आणि त्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यांची प्रकृती बिघडताना पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. दोघांनाही उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान १८ वर्षीय अमन सिंहचा मृत्यू झाला. तर चिमुकला ओमकार सध्या जिल्हा रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण गावात भीतीचं वातावरण 

घटनेची माहिती मिळताच गौर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी अमनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. गावातील दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची कडक तपासणी व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

घटनेने परिसरात खळबळ

या प्रकरणावर बोलताना डीएसपी स्वर्णिमा सिंह यांनी सांगितलं की, "गावातील एका दुकानातून घेतलेला केक खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसऱ्या मुलावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत." या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस