शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:54 IST

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं.

बाडमेर जिल्ह्यातील बोर चरणन गावातील शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ए१७१ उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. या अपघातात जयप्रकाशचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी जयप्रकाश बीजी मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये जेवत होता.

जयप्रकाश चौधरी बीजी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार होती. त्याचे वडील धर्मराम शेती आणि मजूरीचं काम करतात. त्यांनी कर्ज घेऊन मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी कोटा येथे पाठवले होते. कोटामध्ये २ वर्षे तयारी केल्यानंतर तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाला आणि अहमदाबादला अभ्यासासाठी गेला. तो २०२३ पासून अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता.

"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव

हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

असं सांगितलं जात आहे की, अपघातापूर्वी जयप्रकाशचे काही मित्र आंबे खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते, जे वाचले. त्याच्या मित्रांनी जयप्रकाशलाही बाहेर येण्यास सांगितलं होतं पण त्याने जेवणासाठी मेसमध्ये जाईन असं सांगून बाहेर जाण्यास नकार दिला. अपघातात जयप्रकाशचं शरीर ३० टक्क्यांपर्यंत भाजलं होतं. मात्र मातीचा ढिगारा त्याच्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. या दुर्घटनेत अहमदाबादचे रहिवासी अनिल पटेल यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा हर्षित आणि सून पूजा यांना गमावलं आहे, परंतु आता अनिल यांना एकच आशा आहे की, प्रशासन त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा मृतदेह लवकरच त्यांच्या स्वाधीन करेल. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादdoctorडॉक्टरGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया