भविष्यात बार कोड सर्वांना बंधनकारक

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

रॅप फोटो बार कोड सेमिनार नावाने.....

Bar codes are binding to everyone in the future | भविष्यात बार कोड सर्वांना बंधनकारक

भविष्यात बार कोड सर्वांना बंधनकारक

प फोटो बार कोड सेमिनार नावाने.....
फोटो ओळ - बार कोडवरील जनजागृती कार्यक्रमात बोलताना पी. एम. पार्लेवार, बाजूला डॉ. पी. बी. काळे, रामदास टेकाम व एस. आर. खुजनारे

पी. बी. काळे : एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम

नागपूर : भविष्यात बार कोड सर्वच उत्पादकांना बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे बार कोडसंदर्भात आताच व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे असे मत वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थानचे संचालक डॉ. पी. बी. काळे यांनी व्यक्त केले.
एमएसएमई - डेव्हलपमेन्ट इन्स्टट्यिूट नागपूरतर्फे नुकताच बार कोडवर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आयोजक संस्थेचे संचालक पी. एम. पार्लेवार अध्यक्षस्थानी तर, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या नागपूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक रामदास टेकाम प्रमुख अतिथी होते. काळे यांनी पुढे बोलताना उत्पादनाच्या गुणवत्तेच्या हमीसाठी बार कोड आवश्यक असल्याचे सांगून संस्थानच्या विविध कार्यांची माहिती दिली.
पार्लेवार यांनी बार कोडचे महत्व समजावून सांगितले. बार कोडमुळे विक्रेता व खरीददारामध्ये माहितीचे आदानप्रदान होते. बार कोड नोंदणीसाठी लागू ७५ टक्के परतफेड योजनेचा उत्पादकांनी लाभ घ्यावा. बाजारातील वाढत्या स्पर्धेत परिश्रम करूनच यश मिळविता येऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. टेकाम यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले तर, तांत्रिक सत्रात राकेश अंधारे यांनी बार कोडचे फायदे व नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. सहायक संचालक सुनील खुजनारे यांनी संचालन केले तर, डी. आर. जोहरी यांनी आभार मानले.

Web Title: Bar codes are binding to everyone in the future