शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

वॉटर, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सवर उत्तराखंडात बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:20 AM

संपूर्ण उत्तराखंड राज्यामध्ये सर्व प्रकारच्या वॉटर तसेच अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सवर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

नैनिताल : संपूर्ण उत्तराखंड राज्यामध्ये सर्व प्रकारच्या वॉटर तसेच अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सवर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. साहसी खेळांमधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत धोरण तयार करावे व वॉटर स्पोर्ट्समुळे पर्यावरणाचा जो नाश होत आहे, तो थांबवण्याबाबतही उपाय आखावेत, असे आदेश न्यायालयाने उत्तराखंड सरकारला दिले आहेत.अशा खेळांचे आयोजन करणाऱ्या कंपन्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत. काही कंपन्यांनी नदीच्या पात्रातच अनधिकृत बांधकामे केली आहेत. ही बाब सामाजिक कार्यकर्ते हरिओम कश्यप यांनी याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने वरील आदेश दिले. राज्य सरकारने दोन्ही प्रकारच्या खेळांबाबतचे धोरण दोन आठवड्यांतच तयार करायचे आहे. मात्र सरकारने या काळात धोरण व नियम तयार न केल्यास बंदीची मुदत वाढण्याची शक्यता आहे. नदीपात्रात अनेकदा पर्यटक मद्यपान करतात, कंपन्या कॅम्पसाठी बांधकामे करतात, हे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे.उत्तराखंडमध्ये देशभरातून लोक पर्यटनासाठी तसेच वॉटर व अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जात असतात. तिथे कायम त्यासाठी शिबिरे सुरू असतात. नदीच्या पात्रात रिव्हर राफ्टिंग केले जाते. पॅराग्लायडिंगही तिथे लोकप्रिय आहे. हे सारे टिहरी धरणाच्या पात्रात होत असले तरी त्यावर राज्य सरकारने कोणतीच बंधने घातलेली नाहीत. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या कंपन्या वा राज्य सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे न्यायालयाला हे आदेश द्यावे लागले आहेत. (वृत्तसंस्था)>हजारोंचा रोजगार अवलंबूनअ‍ॅडव्हेंचर व वॉटर स्पोर्ट्स ही उत्तराखंडची वैशिष्ट्येच बनली आहेत. राज्यात पूर्वीपासून गिर्यारोहकांच्या प्रशिक्षणाची सोय आहेत. पण आता अनेक जण वॉटर स्पोर्ट्ससाठी तिथे जातात. यामुळे राज्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. त्या भागांतील रेस्टॉरंट्स, हॉटेल, धाबे, विविध वस्तू विकणारे फेरीवाले यांचे पोटही पर्यटनावरच अवलंबून आहे. राज्य सरकारला या साºयातून मिळणारा करही मोठा आहे.

टॅग्स :Courtन्यायालय