५ दिवस बंद राहणार बँका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:40 IST2024-12-24T07:40:33+5:302024-12-24T07:40:56+5:30
नाताळाच्या सुट्यांमुळे देशाच्या विविध भागांत डिसेंबर २०२४ मध्ये बँका ५ दिवसपर्यंत बंद

५ दिवस बंद राहणार बँका
नवी दिल्ली : नाताळाच्या सुट्यांमुळे देशाच्या विविध भागांत डिसेंबर २०२४ मध्ये बँका ५ दिवसपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र या सुट्या सर्व राज्यांत समान नाहीत. काही राज्यांत यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून या सुट्यांची घोषणा केली आहे. नाताळ हा सण येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त जगभर साजरा केला जातो. भारतात गोवा आणि इशान्य भारतातील राज्यांत नाताळानिमित्ताने विशेष उत्साह असतो.
२४ डिसेंबर, मंगळवार (कोहिमा, ऐझॉल)
२५ डिसेंबर, बुधळवार (सर्व राज्यांत)
२६ डिसेंबर, गुरुवार (काही राज्यांत)
२७ डिसेंबर, शुक्रवार (काही राज्यांत)
२८ डिसेंबर, शनिवार (चौथा शनिवार)
२९ डिसेंबर, रविवार (साप्ताहिक सुटी)
नव वर्षाआधी काही ठिकाणी बँकांना २ दिवस राहणार सुटी
३० डिसेंबर : यू किआंगनिमित्त शिलाँगमध्ये सुटी
३१ डिसेंबर : नववर्ष पूर्वसंध्येनिमित्त काही राज्यांत सुटी