ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:49 AM2020-07-28T04:49:01+5:302020-07-28T04:49:27+5:30

सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे.

Banks will be closed for 12 days in August; Find out ... | ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या...

ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये अनेक राष्ट्रीय व स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल होईल.
ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मुहर्रम आणि हरतालिका तीज असे अनेक सण-उत्सव आहेत. यातील काही सण-उत्सवांना राष्ट्रीय सुट्या असतात. तर काही सण-उत्सवांना प्रादेशिक-स्थानिक पातळ्यांवर सुट्या असतात. याशिवाय या महिन्यात पाच रविवार आले आहेत. त्यातच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणून ८ आणि २९ ऑगस्ट रोजी सुट्या असतील.
ऑगस्टमधील सण, उत्सवांच्या सुट्या

१ ऑगस्ट शनिवार बकरी ईद
(राजपत्रित सुटी)
३ ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन
(स्थानिक सुटी)
११ ऑगस्ट मंगळवार गोकुळाष्टमी
(स्थानिक सुटी)
१२ ऑगस्ट बुधवार गोकुळाष्टमी
(राजपत्रित सुटी)
१५ ऑगस्ट शनिवार स्वातंत्र्य दिन (राजपत्रित सुटी)
२१ ऑगस्ट शुक्रवार तीज-हरतालिका (स्थानिक सुटी)
२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी
(स्थानिक सुटी)
३० ऑगस्ट रविवार मोहर्रम
(राजपत्रित सुटी)
३१ ऑगस्ट सोमवार ओनम
(स्थानिक सुटी)
रिझर्व्ह बँकेच्या कोष्टकानुसार १ आॅगस्ट रोजी बँका चंदीगड, पणजी आणि गंगटोक वगळता देशातील सर्व शहरांत बंद राहतील.

Web Title: Banks will be closed for 12 days in August; Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.