वडाळागावात बॅँक लुटीचा प्रयत्न
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:08+5:302015-02-14T23:52:08+5:30
अनर्थ टळला : युवकांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांचा पोबारा

वडाळागावात बॅँक लुटीचा प्रयत्न
अ र्थ टळला : युवकांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांचा पोबारावडाळागाव : येथील केबीएच विद्यालयाच्या आवारात असलेली जनलक्ष्मी बॅँकेची शाखा शुक्रवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरातील जागृक युवकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा बॅँक लुटीचा प्रयत्न फसला.जनलक्ष्मी बॅँकेची वडाळागावात अत्यंत जुनी शाखा असून, या बॅँकेचे वडाळागावात बहुतांश खातेदार आहे. या बॅँकेचे शटर रात्रीच्या सुमारास एक ते दीड फुटापर्यंत उघडे असल्याने जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या बॅँकेसमोर राहणार्या एका युवकाला चोरीचा संशय आला. त्या युवकाने तत्काळ परिसरातील अन्य मित्रांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करत सदर प्रकार कळविला; मात्र चोरट्यांना नागरिक जागे झाल्याची कुणकुण लागल्याने सर्व युवक जमा होण्यापूर्वीच चोरट्यांनी बॅँकेतून पोबारा केला. युवकांनी तातडीने बॅँकेच्या दिशेने धाव घेतली व पोलिसांना घटनेची माहिती कळविली. दरम्यान, घटनास्थळी गस्त पथकावर असलेले इंदिरानगर पोलिसांचे पथक दाखल झाले. तेव्हा चोरट्यांनी अलगदपणे शटरचे दोन्ही कुलूप उघडून नेलेले असल्याचे आढळून आले. बॅँकेच्या बाहेरील लाईट कर्मचार्यांकडून रात्रभर बंद ठेवलेली असते तसेच विद्यालयाच्या आवारात पथदीपच नसल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य रात्रीच्या वेळी पसरते. तसेच बॅँक असूनदेखील या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा किंवा सुरक्षारक्षक नसल्यामुळेच चोरट्यांनी सदर शाखा लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.इन्फो..... निष्काळजीचा बॅँकेवर आरोपवडाळागाव परिसरात असलेल्या जनलक्ष्मी बॅँकेच्या प्रशासनाकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. कारण बॅँकेच्या व्यवस्थापनाकडून रात्रभर बाहेरील लाईट बंद ठेवलेला असतो तसेच संवेदनशील परिसर असूनदेखील बॅँके च्या व्यवस्थापनाने या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला नाही. त्यामुळे गोरगरीब नागरिक जे बॅँकेचे खातेदार आहेत व त्यांनी सदर बॅँकेत ठेवी जमा केल्या आहेत अशा खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत बॅँक व्यवस्थापन दक्ष नसल्याचे योगेश वाभळे, सरफराज शेख, समीर शेख, हुसेन शेख, नईम शेख, धनंजय वाभळे आदि युवकांचे म्हणणे आहे. सदर बॅँकेच्या प्रशासकीय कार्यालयाकडून येथील शाखेबाबत सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने केल्या गेल्या नाही, तर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या इशारा जागृक युवकांनी दिला आहे. येत्या सोमवारी बॅँकेच्या मुख्य व्यवस्थापकांना सुरक्षिततेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.