बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

By Admin | Updated: April 16, 2016 00:07 IST2016-04-15T01:54:46+5:302016-04-16T00:07:23+5:30

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शतकपूर्ती रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक क्षेत्रतर्फे गडकरी चौक येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले.

Bank of Maharashtra, Dr. Salute to babasaheb | बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शतकपूर्ती रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक क्षेत्रतर्फे गडकरी चौक येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्र नाशिकचे क्षेत्रिय प्रबंधक श्री. प्रताप मोहंती, उप क्षेत्रिय प्रबंधक देविदास वसईकर, नाशिक शहर शाखेचे शाखाप्रमुख संजय वाघ, एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर सोनकुसळे तसेच इतर मान्यवर व कर्मचारीवृंद उपस्थित होते. याप्रसंगी मोहंती यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडताना त्यांना केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
संजय वाघ, सुधाकर सोनकुसळे, नितीन पिंपळे, बन्सवाल यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र घोडेराव यांनी केले. समारोप अमित सुतकर यांनी केला.
बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक क्षेत्रतर्फे नाशिकरोड येथील तक्षशिला विद्यालयाला १५ सिलिंग फॅन्सचे वाटप करण्यात आले.
-----

Web Title: Bank of Maharashtra, Dr. Salute to babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.