बंगळुरू विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण- शाळेच्या चेअरमनला अटक
By Admin | Updated: July 23, 2014 12:15 IST2014-07-23T11:51:14+5:302014-07-23T12:15:09+5:30
बंगळुरू येथील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारप्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे

बंगळुरू विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण- शाळेच्या चेअरमनला अटक
>ऑनलाइन टीम
बंगळुरू, दि. २३ - येथील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारावरून वातावरण तापलेले असतानाच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे.
विबग्योर हायस्कूलमध्ये २ जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात लोकांनी बलात्कार केला होता; परंतु १५ जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली. मुस्तफा असे या आरोपीचे नाव असून त्याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आली होती.
या घटनेमुळे कर्नाटकसह देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते.