शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Bangalore Schools Bomb: बंगळुरुतील 7 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:08 IST

Bangalore Schools Bomb: या शाळांना ज्यावेळीस ईमेल मिळाले, तेव्हा काही शाळांमध्ये परीक्षा सुरू होत्या. सध्या पोलिस शाळांची तपासणी करत आहे.

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील 7 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासाने विद्यार्थ्यांना तात्काळ शाळांमधून बाहेर काढले. यानंतर बंगळुरू पोलिसांकडून शाळांची तपासणी केली जात आहे. तसेच, पोलिसांचे सायबर सेल विभाग तो ईमेल कुठून आला, याचा तपास करत आहे.

दोन शाळांमध्ये बॉम्ब सापडले नाहीतबंगळुरू पूर्वचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. सुब्रमण्यस्वर राव यांनी सांगितले की, 'अशा प्रकारचे ईमेल बहुतेक वेळा खोटे असतात. पण, आम्ही त्यांची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दोन शाळांमध्ये तपास पूर्ण झाला असून, तिथे बॉम्ब सापडले नाहीत. मुलांना परत घेऊन जाण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले आहे. काही शाळांमध्ये परीक्षा सुरू होत्या, मात्र परीक्षेत कोणताही गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मेलमध्ये काय लिहिले होते?ज्या मेलद्वारे शाळांना धमकी देण्यात आली आहे, त्यात लिहिले- 'तुमच्या शाळेत खूप मोठा बॉम्ब ठेवण्यात आला आहे. लक्ष द्या, हा विनोद नाही. तुमच्यासह हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. याची तात्काळ पोलिसांना तक्रार करा, उशीर करू नका. आता सर्वकाही फक्त तुमच्या हातात आहे.'

या 7 शाळांना धमकीचा ईमेलबंगळुरुतील 1. दिल्ली पब्लिक स्कूल, वरथूर 2. गोपालन इंटरनॅशनल स्कूल, महादेवपुरा 3. न्यू अकादमी स्कूल, मराठाहल्ली 4. सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल, 5. इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा 6. एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल, इलेक्ट्रॉनिक सिटी या शाळांना धमकीचा ईमेल आला आहे.

टॅग्स :bangalore-central-pcबंगलोर सेंट्रलBombsस्फोटकेPoliceपोलिसSchoolशाळा