शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांची पहिली पसंती 'भाजप', 2014 पासून 211 आमदार-खासदार भाजपमध्ये सामील, काँग्रेसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:42 IST

एडीआरच्या अहवालातील आकडेवारीनुसार, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

जनता दलाचे (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर आठवड्याभरात शुक्रवारी मणिपूरमधील पक्षाच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 2014 पासून पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार आणि खासदारांची संख्या 211 वर पोहोचली आहे. मणिपूरमधील एकमेव जनता दलाचे (यू) आमदार जे भाजपमध्ये सामील झाले नाहीत, ते लिलाँगचे आमदार मोहम्मद नसीर आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूरमधील 60 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभेत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चाही पाठिंबा आहे. आता जनता दलाचे (यू) पाच आमदारही भाजपमध्ये सामील झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात भाजपसोबतची युती तोडल्याचा परिणाम म्हणून मणिपूरमधील या राजकीय घडामोडीकडे पाहिले जात आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालाच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की, 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून 2022 पर्यंत 211 आमदार आणि खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. दुसरीकडे, या काळात 60 आमदार आणि खासदार भाजपमधून बाहेर पडले आहेत. विरोधी पक्ष भाजपवर आपली 'संसाधने', प्रलोभने आणि सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करत आहेत.

मणिपूरमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर जनता दलाने (यू) भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने आमदारांना जनता दला(यू) पासून वेगळे करण्यासाठी आपल्या संसाधनांचा वापर केला आहे, असा आरोप जनता दलाने (यू) केला आहे. दरम्यान, जनता दला (यू)सह विरोधी पक्ष आपल्या आमदारांना चांगली वागणूक देत नाही, असा आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्काएडीआरच्या अहवालातील आकडेवारीनुसार, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 2014 ते 2021 पर्यंत ही संख्या 177 आहे आणि या वर्षी गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 20  यामध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी 84 जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्यापैकी 2021 पर्यंत 76 आणि यंदा जवळपास 8 नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस