शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:34 IST

शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथील बँकेत ग्रामस्थ, शेतकरी आणि मजुरांनी गोंधळ घातला. त्यांच्या खात्यातील मजुरीचे पैसे, कर्जाचे पैसे, किसान सन्मान निधी आणि पेन्शनचे पैसे अचानक गायब झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक करून पैसे काढले आहेत. याठिकाणी सुमारे ३०० ते ४०० पोहोचले होते, त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.

जसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडरिया गाव ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यांचे पैसे फसवणूक करून इतर लोकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 

बँक व्यवस्थापक व बांदा येथील अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. यानंतर त्यांनी बँकेबाहेर निदर्शने करत पैशांची मागणी केली. सुनावणी झाली नाही, तेव्हा जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली, त्यावर मंत्र्यांनी तातडीने डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक रामराज मीना यांनी ग्रामस्थांनी केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं. ज्या लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्या सर्वांना बँक स्टेटमेंट काढून देण्यात आलं आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद म्हणाले की, आज गडरिया गावातील रहिवासी आणि शेतकरी आले होते. गावातील बँकेत खातं उघडून त्यांनी कष्टाचे पैसे जमा केले होते. त्यांच्या खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्यात आले असून त्यांचे ट्रान्जेक्शन इतर खात्यांमध्ये झाल्याची या सर्वांची तक्रार आहे.

या प्रकरणी डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. चौकशीनंतर मला कळवा आणि कारवाई करा, असं मी म्हटलं आहे. ३०० ते ४०० लोकांचा तपशील देण्यात आला आहे, जे बँकेचं पासबुक घेऊन आले होते असं रामकेश निषाद यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशbankबँकMONEYपैसा