शाळांमधील लैंगिक शिक्षणावर बंदी घाला
By Admin | Updated: June 28, 2014 01:38 IST2014-06-28T01:38:18+5:302014-06-28T01:38:18+5:30
शाळेतून दिल्या जाणा:या लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्याचा प्रस्ताव कधीच ठेवला नाही, असा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला.

शाळांमधील लैंगिक शिक्षणावर बंदी घाला
>नवी दिल्ली : शाळेतून दिल्या जाणा:या लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्याचा प्रस्ताव कधीच ठेवला नाही, असा खुलासा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला.
एड्सवर आळा घालण्यासाठी कंडोम वापरण्याऐवजी सुसंस्कार आणि वैवाहिक जीवनात एकनिष्ठता अधिक प्रभावी ठरेल, असे विधान करून आधीच वादाला तोंड फोडणा:या हर्षवर्धन यांच्या
कोलांटउडीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संपुआ सरकारने पौगंडावस्थेतील मुलांसाठी लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय 2क्क्7 मध्ये घेतला होता. त्यावर एका वेबसाईटवर भाष्य करताना व्यक्त केलेले मत वैयक्तिक होते. मी लैंगिक शिक्षणावर बंदीचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा हर्षवर्धन यांनी केला. हर्षवर्धन हे सध्या अमेरिकेच्या दौ:यावर आहेत. मी पेशाने एक डॉक्टर आहे. मी तर्कसंगत विचार करीत आलो आहे. वैज्ञानिक व सांस्कृतिकदृष्टया योग्य शिक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीमधील शाळांसाठी हर्षवर्धन यांनी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. यात शाळांमध्ये दिले जाणारे हे तथाकथित लैंगिक शिक्षण बंद केले जावे. अभ्यासक्रमाशिवाय विद्याथ्र्याना भारतीय संस्कृतीसंदर्भातील संस्कार देण्यावर विशेष भर द्यावयास हवा, अशी सूचनाही हर्षवर्धन यांनी वेबसाईटवर केल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले होते. दरम्यान हर्षवर्धन यांचे हे वैयिक्तक मत असल्याचे त्यांच्या मंत्रलयाने म्हटले आहे. भाजपने या वादावर कुठलीही प्रतिक्रिया न देता मौन पाळले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4बंदी घालण्यासंदर्भातील विषय हा पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणो योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाचे प्रवक्ते संजय कौल यांनी दिली.
4व्हिजन डॉक्युमेंटवर आक्षेप घेत आरोग्य क्षेत्रतील काही कार्यकत्र्यानी हर्षवर्धन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवीत असल्याची टीका केली.