शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कार्टून चॅनेलवर जंक फूड, कोका-कोलाच्या जाहिरातींवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:18 IST

कार्टून चॅनलवरील जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी

नवी दिल्ली - लहान मुलांच्या आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नयेत, या दृष्टीकोनातून केंद्र सरकारनं कार्टून चॅनेलवर काही खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी वाढणा-या समस्यांच्या पार्श्वभूमीवर कार्टून चॅनलवर येणा-या जंक फूड आणि कोका-कोलाच्या जाहिरातींवर सरकारनं बंदी आणली आहे.  

लहान मुलांमधील वाढणा-या आरोगाच्या समस्या घटवण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण कमी करण्याच्या दिशेनं सरकारनं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कंपन्यांच्या जाहिरातींवर अन्य चॅनेलवरही बंदी घालण्यासंदर्भात सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. कार्टून चॅनेलवर जंक फूड किंवा कोक सारख्या पेय-पदार्थांच्या जाहिराती प्रसारित करू नये, असे निर्देश माहिती-प्रसारण मंत्रालयानं कोका कोला, नेस्लेसहीत अन्य 9 कंपन्यांना दिले आहेत. 

''जंक फूडच्या जाहिराती पाहून लहान मुलांना जंक फूड खाण्याची वाईट सवय लागते. तसंच टीव्ही पाहत-पाहत लहान मुलं अशा पदार्थाचं सेवनही करतात. या सवयीमुळे शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या निर्णयाद्वारे लहान मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल'', अशी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली आहे. ते राज्यसभेत बोलत होते.

प्रेक्षकांची दिशाभूल करणा-या जाहिरातींसंबधी भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीनं आपला अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला आहे. यावर केंद्र सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Junk Foodजंक फूडGovernmentसरकारAdvertisingजाहिरात