देशभरात करा गोहत्या बंदी, मुस्लिमांनीही सोडा मांस खाणं- आझम खान
By Admin | Updated: March 27, 2017 19:01 IST2017-03-27T19:01:07+5:302017-03-27T19:01:49+5:30
उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यांवर योगी आदित्यनाथ सरकारकडून कारवाई सुरू आहे.

देशभरात करा गोहत्या बंदी, मुस्लिमांनीही सोडा मांस खाणं- आझम खान
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 27 - उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यांवर योगी आदित्यनाथ सरकारकडून कारवाई सुरू आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेता आझम खान यांनी संपूर्ण देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, याशिवाय मुस्लिमांनी मांस खाणं सोडून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
संपूर्ण देशभरात कायदा समान असावा असं म्हणत त्यांनी देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी केली. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये हे कायदेशीर आहे तर इतर राज्यात बेकायदेशीर असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये कायदेशीर कत्तलखान्यांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. प्राणी कायदेशीर कत्तलखान्यांमध्ये कापले जातात हे वैध आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये कापले जाणे बेकायदेशीर हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
सर्व कत्तलखाने बंद व्हायला पाहिजे कोणत्याही प्राण्याची कत्तल करू नये असं म्हणत त्यांनी जैन समाजाचं उदाहरण दिलं. इस्लाममध्ये मांस खाणं बंधनकारक करण्यात आलेलं नाही त्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणं सोडून द्यावं असं ते म्हणाले.