शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनच्या न्यूज अ‍ॅपवर बंदी आणा; इंडियन न्यूज पेपर सोसायटीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:42 IST

या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी

नवी दिल्ली : भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाइट यांचा संपर्क चीनने रोखल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात भारताने चीनची गुंतवणूक असलेले सर्व न्यूज अ‍ॅप आणि अन्य प्लॅटफार्म यांच्यावर प्रतिबंध आणावेत, अशी मागणी देशातील प्रिंट आणि डिजिटल न्यूज प्रकाशकांनी केली आहे.इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्ष शैैलेश गुप्ता यांनी सांगितले की, चीनच्या सरकारने तांत्रिकदृष्ट्या प्रतिबंध केल्याने भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाइट यांची आता तिथपर्यंत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या (व्हीपीएन) माध्यमातूनही पोहोच राहिलेली नाही.

या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी. चिनी कंपनीविरुद्धच्या कठोर कारवाईच्या मागणीला डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने (डीएनपीए) पाठिंबा दिला आहे. डीएनपीएचे अध्यक्ष पवन अग्रवाल म्हणाले की, सरकारने ५९ चिनी अ‍ॅप ते न्यूज अ‍ॅप/प्लॅटफॉर्मवरील प्रतिबंध वाढवायला हवेत. जेणेकरून, त्यांची भारतातील यूजर्सपर्यंत पोहोच राहणार नाही. सेन्सॉर नसलेले वृत्त लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून चीनच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. एलएसीवर भारत आणि चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

टॅग्स :Chinese Appsचिनी ऍपindia china faceoffभारत-चीन तणाव