शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

EVMच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह;राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:50 IST

Rajasthan Election : राजस्थानमधील किशनगंज विधानसभा क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर आढळून आल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देराजस्थान : रस्त्यावर आढळलं बॅलेट युनिट, दोन अधिकाऱ्यांचं निलंबनईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

जयपूर - राजस्थानमधील किशनगंज विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, बॅलेट युनिट हाताळण्यात निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सध्या हे बॅलेट युनिट किशनगंजच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी राजस्थानमधील आदर्श नगरमधूनही ईव्हीएमसंदर्भातील व्हिडीओ समोर आला होता. येथे तर एक भाजपाच्या नेत्याच्या घरासमोर ईव्हीएम ठेवण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. 

(राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल)

राजस्थानमध्ये मिळाले होते आणखी एक ईव्हीएम राजस्थानमध्ये 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, मतदानानंतर भाजपा नेत्याच्या घरात कथित स्वरुपात ईव्हीएम आढळल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. काही वेळानंतर याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. हा व्हिडीओ आम आदमी पार्टीचे नेते अंकित लाल यांनीही ट्विटरवर शेअर करत भाजपावर हल्लाबोल चढवला.   

छत्तीसगडमधून अटक  दरम्यान, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात स्ट्राँग रुम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली. तर याप्रकरणी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बस्तर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय जगदलपूरमधील धरमपुरा परिसरातील महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी उमापति तिवारी, विजय मरकामसहीत आणखी एका युवकाला अटक केली. 

 

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकPoliceपोलिस