राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:12 AM2018-12-08T06:12:32+5:302018-12-08T06:15:53+5:30

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील.

Congress, good days in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh; The exit poll | राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

googlenewsNext

नवी दिल्ली : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल वा सत्तेपाशी पोहोचेल. तेलंगणात टीआरएसच सत्तेत येईल आणि मिझोरममधील काँग्रेसची सत्ता जाऊ शकेल.
राजस्थान व तेलंगणात शुक्रवारी अुनक्रमे ७२.६८ व ६८ टक्के मतदान झाले. ते संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष येऊ लागले. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपात चुरशीची लढत दिसत असून, तीन चाचण्यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल वा तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे. राजस्थानमध्ये १0 संस्था व वृत्तवाहिन्यांनी मिळून एक्झिट पोल घेतले. त्यात भाजपाच्या पराभवाचे निष्कर्ष निघाले आहेत.
छत्तीसगडही भाजपाकडे राहणे अवघड दिसत आहे. तिथे काँग्रेसचे सरकार येईल, असे तीन पोलचे निष्कर्ष आहेत. तिथे १५ वर्षे भाजपा सत्तेत आहे. तेलंगणात टीआरएसच पुन्हा सत्तेवर येईल, असे निष्कर्ष असून, मिझोरम कदाचित काँग्रेसच्या हातातून मिझो नॅशनल फ्रंटकडे जाऊ शकेल.
>काही चाचण्यांचे निष्कर्ष
मध्य प्रदेश 230 जागा 75% मतदान
सर्वे भाजपा काँग्रेस इतर
अ‍ॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11
टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15
एबीपी-लोकनीती 94 126 10
इंडिया न्यूज-नेता 106 112 12
रिपब्लिक 108-128 95-115 7
न्यूज नेशन 108-112 105-109 11-15
इंडिया टीव्ही 122-130 86-92 6-9
2013 मध्ये । भाजपा 165 । काँग्रेस 58
>राजस्थान 199 जागा 73% मतदान
सर्वे भाजपा काँग्रेस इतर
इंडिया-टुडे अ‍ॅक्सिस 55-72 119-141 04-11
टाइम्स नाउ-सीएनएक्स 85 105 09
रिपब्लिक-सी वोटर 83-103 81-101 15
2013 मध्ये । भाजपा 163 । काँग्रेस 21
>छत्तीसगड 90 जागा 75%
सर्वे भाजपा काँग्रेस इतर
इंडिया न्यूज-नेता 43 40 07
टाइम्स नाउ-सीएनएक्स 46 35 07
इंडिया टुडे 21-31 55-65 04-08
न्यूज नेशन 38-42 40-44 04-08
>मिझोरम 40 जागा 80%
सर्वे काँग्रेस एमएनएफ इतर
रिपब्लिक-सी वोटर 14-18 16-20 3-10
टाइम्स नाउ-सीएनएक्स 16 18 06
2013 मध्ये । काँग्रेस 34
>तेलंगणा 119 जागा 67%
सर्वे टीआरएस काँग्रेस+ भाजपा इतर
सी वोटर 54 53 5 7
इंडिया टुडे 85 27 2 5
जन की बात 57 45 5 12
न्यूजएक्स 57 46 6 10
टाइम्स नाऊ 66 37 7 9
2014 मध्ये । टीआरएस 63 । काँग्रेस 21 । इतर 27
>पोल ऑफ पोल
मध्य प्रदेश भाजपा 109 काँग्रेस 111 इतर 10
राजस्थान भाजपा 78 काँग्रेस+ 110 इतर 11
छत्तीसगड भाजपा 41 काँग्रेस+ 43 इतर 06

Web Title: Congress, good days in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh; The exit poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.