शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 14:03 IST

बेंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक हनुमानजींची वेशभूषा करून पोहोचले होते. एवढेच नाही, तर या रॅलीमध्ये हनुमानजींचे पोस्टरही लावण्यात आले होते.

कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंगबली हे भाजपसाठी संजिवनी ठरत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग  दल या हिंदुत्ववादी संघटनेचा उल्लेख केल्यानंतर, भाजपने ‘बजरंगबली’ यांच्या नावाने व्होट बँक साधण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या जाहीर सभांमधून बजरंगबलींचा उल्लेख करायला विसरत नाहीत. बेंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक हनुमानजींची वेशभूषा करून पोहोचले होते. एवढेच नाही, तर या रॅलीमध्ये हनुमानजींचे पोस्टरही लावण्यात आले होते.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होत आहे. आता निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. या अखेरच्या टप्प्यात हा प्रचार 'बजरंगबलीं'भोवतीच फिरताना दिसत आहे. काँग्रेसने बजरंग दल या हिंदूवादी संघटनेवर बंदी घालण्यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र, लोकांचे लक्ष बजरंगबलींकडे वळविण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसत आहे. याचा फायदा म्हणजे, असंतोषामुळे भाजपमधून बाहेर जाण्याचा विचार करणारे अनेक लोक पुन्हा भाजपसोबत जेडले गेले आहेत. अशाप्रकारे बजरंगबलींनी भाजपला जणू संजीवनी बुटीच दिली आहे. 

बजरंगबली म्हणजेच हनुमानजींचा जन्म कर्नाटकातील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे म्हटले जाते. पण, यासंदर्भात काही राज्यांमध्ये वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या सभांमध्ये 'बजरंगबली की जय' म्हटल्याशिवाय राहत नाहीत. एढेच नाही, तर हनुमानजींचा जन्म कर्नाटकातील किष्किंधा येथे झाला, याचा उल्लेख रामायणात आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

काँग्रेस जाळ्यात अडकली -बजरंगबलींचे नाव आल्यापासून काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली आहे. महत्वाचे म्हणजे, आता काँग्रेसचे सरकार आले तरी बजरंगदलावर बंदी घातली जाऊ शकत नाही, असे खुद्द कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांनी म्हटले आहे. तसेच, असा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसने पास केलेला नाही, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर जर काँग्रेस सत्तेत आली तर राज्य भरात हनुमानजींची मंदिरे बांधली जातील, असे काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस