शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"छातीवर गोळी झेलेन", माजी IPS अधिकाऱ्याच्या गोळ्या मारण्याच्या धमकीवर 'बजरंग' संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:56 IST

Wrestlers Protest March : दिल्लीत देशांतील नामांकित पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. 

नवी दिल्ली : रविवारी देशाच्या नवीन संसदेचं थाटामाटात उद्घाटन पार पडलं. एकिकडे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा जल्लोष साजरा केला जात होता. तर, दुसरीकडे दिल्ली पोलीस आणि देशातील नामांकित पैलवान यांच्यांत आखाड्याबाहेरील 'कुस्ती' सुरू होती. दिल्ली पोलीस आणि पैलवानांच्या दंगलीवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच एका माजी आयपीएस अधिकाऱ्यांनं एक ट्विट केलं, ज्यावर पैलवान बजरंग पुनिया संतापल्याचे पाहायला मिळाले. माजी आयपीएस अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देताना, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत, असं पुनियानं म्हटले आहे. 

माजी आयपीएस अधिकारी एनसी अस्थाना यांनी पैलवानांवर झालेली कारवाई योग्य असल्याचे ट्विट केले. तसेच गरज भासल्यास गोळी देखील मारली जाईल, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. रविवारी दिल्ली पोलिसांनी नवीन संसंद भवनासमोर आंदोलन करू इच्छित पाहणाऱ्या पैलवानांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून पैलवानांना आंदोलक करण्यापासून रोखले. महिनाभराहून अधिक काळ जंतरमंतर येथे कुस्तीगीर आंदोलन करत आहेत. पोलीस पैलवानांना ताब्यात घेत असताना बजरंग पुनियाने म्हटले, "आमच्यावर गोळ्या झाड्या."

माजी IPS अधिकाऱ्यानं काय लिहलं?बजरंग पुनियाच्या या विधानावर माजी IPS अधिकारी एनसी अस्थाना यांनी म्हटले, "गरज पडल्यास गोळ्याही झाडू. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही. सध्या कचऱ्याच्या ठेक्याप्रमाणे उचलून फेकले आहे. कलम १२९ मध्ये पोलिसांना गोळी मारण्याचा अधिकार आहे. योग्य वेळ आल्यावर ती इच्छा देखील पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक आहे. मग पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू." 

अस्थाना यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना बजरंग पुनियाने लिहले, "हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबद्दल बोलत आहेत. भाऊ समोर उभे आहोत, मला सांगा गोळी खाण्यासाठी कुठे येऊ. मी शपथ घेतो, छातीवर गोळ्या झेलू पाठ दाखवणार नाही." 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसVinesh Phogatविनेश फोगट