शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

आखाड्याबाहेरील कुस्ती 'नार्को टेस्ट'वर! आंदोलक पैलवानांनी ब्रिजभूषण यांचे आव्हान स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 15:46 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : देशातील नामांकित पैलवानांची २३ एप्रिलपासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील 'दंगल' सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे, तरी अद्याप यावर कोणताही तोडगा निघाल्याचे दिसत नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असला तरी आंदोलक पैलवान सिंह यांच्या अटकेवर ठाम आहेत. भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते. 

सोमवारी बजरंग पुनियाने हे आव्हान स्वीकारताना म्हटले, "आम्ही कोणत्याही टेस्टसाठी तयार आहोत, पण ते सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवे. संपूर्ण देशाला याची प्रश्नोत्तरे ऐकायला मिळावीत म्हणून नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी." तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे घोटाळे मोजायचे असतील तर आम्ही नार्को टेस्टसाठी तयार आहोत. लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या प्रशिक्षकांची देखील नार्को टेस्ट करावी, असेही पुनियाने सांगितले. खरं तर ब्रिजभूषण यांनी रविवारी सांगितले होते की, मी माझी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे, पण माझ्यासोबत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनीही ही टेस्ट करायला हवी, अशी माझी अट आहे.

पैलवानांच्या समर्थनार्थ खाप पंचायतलैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दबाव आणण्यासाठी रविवारी खाप पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे खाप पंचायतीने २३ मे रोजी कुस्तीपटूंच्या कँडल मार्चमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. सर्वजण एका ठिकाणी जमतील. शेतकरी आंदोलनाप्रमाणे कुस्तीपटूंचे हे प्रदर्शन दीर्घकाळ चालणार आहे. 

मंगळवारी आंदोलनाला १ महिना होणारऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या मंगळवारी या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.  

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगटrakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाsexual harassmentलैंगिक छळ