शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१३० गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:56 IST

Crime News: कोरोनामुळे मृत्यूचे भय हे अटकपूर्व जामिनासाठी योग्य कारण ठरवणाऱ्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

- डॉ. खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : कोरोनामुळे आरोपीस मृत्यूचे भय वाटणे हे अटकपूर्व जामीन देण्यासाठी योग्य कारण असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा इतर जामीन अर्जासाठी संदर्भ म्हणून वापर करण्यास न्या. विनीत सरीन व भूषण गवई यांनी मनाई केली आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रतीक जैन यांना एका गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला. अटक झाल्यास आपल्याला कोरोनाची बाधा होईल व यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो, या मुद्यावर प्रतीक जैन यांनी जामीन मागितला होता. त्यांच्याविरुद्ध तब्बल १३० गुन्हे दाखल होऊनही उच्च न्यायालयाने कारण मान्य करत जामीन मंजूर केला. कोरोनामुळे मृत्यूचे भय हे जामीनासाठी योग्य कारण असल्याचे मत व्यक्त करत याबद्दल व्यापक मतही व्यक्त केले होते.उत्तर प्रदेश सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १३० गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला जामीन देणे चुकीचे असल्याचे अपिलात नमूद केेले. याशिवाय या आदेशाचा संदर्भ घेत अनेक आरोपी जामीन मागत असल्याचेही सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने जामीन आदेश स्थगित केला आणि अन्य जामीन अर्जात याचा संदर्भ देण्यासही मनाई केली. उच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील निकालात व्यक्त केलेल्या व्यापक मतासही स्थगिती देण्यात आली. 

स्थगिती देण्यात आलेले व्यापक मत...राज्यातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे आरोपींच्या मृत्यूची शक्यता आहे.आरोपीचे पूर्वचारित्र्य, फरार होण्याची शक्यता या बाबी सद्य:स्थितीत दुय्यम ठरतात.जगण्याच्या अधिकाराचेच संरक्षण झाले नाही तर मुक्ततेचा अधिकार व्यर्थ आहे.अटक केल्यानंतर कोठडीत, जामीन झाल्यास तुरुंगात इतर कैद्यांकडून आरोपीस हाताळणारे पोलीस यांच्याकडूनही आरोपीस कोरोनाची बाधा होऊ शकते.आरोपी जिवंत राहिला तरच अटक, जामीन, खटला ही प्रक्रिया शक्य आहे.आरोपी त्याच्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे मृत्यू पावला व न्यायालयाने हे टाळणे शक्य असूनदेखील संरक्षण दिले नाही तर जामीन मंजूर करणे किंवा फेटाळणे हे सर्व निरर्थक आहे.असाधारण परिस्थिती हाताळण्यासाठी असाधारण उपाय योजनांचीच आवश्यकता असते. कायद्याचा अर्थ लावताना हे तत्व लक्षात ठेवले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय