शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 11:58 IST

समाजवादी पार्टीसोबतच महाआघाडी संपुष्टात

लखनऊ: लोकसभा निवडणूक समाजवादी पार्टीसोबत लढवणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावतींनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा महाआघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर समाजवादी पार्टीच्या नेतृत्त्वाचं वर्तन फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे यापुढे सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा स्वतंत्रपणे लढेल, अशी घोषणा मायावतींनी केली. (सविस्तर वृत्त लवकरच)पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी यापुढे बसपा येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढेल, असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलं. काल लखनऊमध्ये बसपाची बैठक झाली. या बैठकीबद्दल प्रसारमाध्यमांनी दिलल्या बातम्या पूर्णपणे खऱ्या नसल्याचं मायावतींनी ट्विटरद्वारे स्पष्ट केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सपासोबतच्या महाआघाडीवरही भाष्य केलं. 'सपासोबतचे जुने मतभेद विसरून, 2012-2017 या कालावधीत सत्तेत असलेल्या सपानं घेतलेले दलितविरोधी निर्णय बाजूला ठेवून आम्ही देशहितासाठी त्यांच्यासोबत आघाडी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडी धर्माचं निष्ठेनं पालनदेखील केलं,' असं मायावतींनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीनंतरचं सपाचं वर्तन पाहून आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं मायावतींनी जाहीर केला. 'लोकसभा निवडणुकीनंतरचं सपाचं वर्तन योग्य नाही. अशा पद्धतीनं भाजपाला पराभूत करणं शक्य आहे का? यावर विचार करण्याची वेळ सपानं आणली. या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळे पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी बसपा यापुढे होणाऱ्या सर्व लहान-मोठ्या निवडणुका स्वबळावर लढवेल,' अशी घोषणा त्यांनी केली. 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश