शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 21:20 IST

सपाचे माजी खासदार राकेश सचान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. डिसेंबरमध्ये भाजपामधून बाहेर पडलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप करत फुले यांनी दोनच महिन्यांपूर्वी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बहराईचच्या खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबरमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीदेखील काँग्रेसचा हात धरला. लोकसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे राहिले असताना आजी-माजी खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत. राम मंदिर आणि दलितांवरील हल्ल्यांवरुन सावित्रीबाई फुलेंनी भाजपाला अनेकदा लक्ष्य केलं होतं. भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्येत 1992 सारखी परिस्थिती निर्माण करत आहे. समाजात फूट पाडून तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. त्यामुळेच पक्ष सोडत असल्याचं फुले म्हणाल्या होत्या. भाजपा दलितविरोधी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. यापुढे भाजपाचा आणि माझा कोणताही संबंध नाही. जिवंत असेपर्यंत भाजपात परत जाणार नाही, असंदेखील फुलेंनी पक्ष सोडताना म्हटलं होतं. 2014 मध्ये बहराईचमधून खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये बहराईचच्या बेल्हामधून विधानसभा निवडणूक लढवली होती. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९