शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बहाद्दर पृथ्वीराज यांनी कथन केली आपबिती, 'ती' चिमुकली माझ्याजवळ आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 16:57 IST

मोरबी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

अहमदाबाद - महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्येहीपूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर अन् सांगलीप्रमाणेच गुजरातमधील मोरबी येथेही असाच महापूर आला आहे. या संकटसमयी आपले कर्तव्य बजावतानाचा एका पोलीस हवालदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोरबी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या पृथ्वीराज जडेजा यांच्या कार्याला लाखो लोकांनी सॅल्यूट केला आहे.

मोरबी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. महापूराच्या पाण्यातून वाट काढताना पृथ्वीराज जडेजा यांनी चक्क 1.5 किलो मीटरचा प्रवास केला. या प्रत्येक पावलागणीस ते जपून जपून पुढे चालत होते. कारण, स्वत:साठी नव्हे तर आपल्या खांद्यावर असलेल्या दोन चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. चोहोबाजुंनी पाण्यानं वेढलेलं असतानाही तब्बल दीड किलो मीटरचं अंतर या बहाद्दर पोलीस शिपायानं पार केलंय. सोशल मीडियावर या पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ठोकला जात आहे. तर, अनेकजण खाकी वर्दीतला माणूस म्हणून जडेजा यांच कौतुक करत आहे. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही ट्विट करुन पोलीस शिपाई पृथ्वीराज जडेजा यांच कौतुक केलं आहे.

मोबरी जिल्ह्यातील या धाडसी कार्याबद्दल जडेजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''कच्छमधील गावातून मागणी करणार फोन आल्यानंतर आमचे पथक मदतीसाठी तेथे पोहोचले. गावाला पाण्याने वेढलेले होते, गावात जाण्याचा मार्गही नव्हता. अशा परिस्थीत आम्ही गावात पोहोचलो. गावात जवळपास 40 लोकं अडकली होती. त्यावेळी, फक्त एकच विचार डोक्यात होता. या लोकांना वाचवायचं आहे. दुसरा कुठलाही विचार डोक्यात नव्हता, काय होईल अन् कसं होईल हे विचारात नव्हत,'' असं जडेजा यांनी म्हटलंय. तसेच, ती लहान मुलगी माझ्याजवळ आली होती. माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची विनवणी करत होती. त्यावेळी, तिला बाहेर काढणं एवढाच विचार माझ्या डोक्यात होता, पुरातून या दोघांना बाहेर काढायचंय फक्त हाच माझा विचार होता, असेही जडेजा यांनी म्हटलं आहे.  

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसfloodपूरRainपाऊस