शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Bageshwar Dham Sarkar : 'माझा शिष्य चारित्र्यहीन नाही, हा एक चमत्कार आहे', बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:52 IST

Bageshwar Dham Sarkar : 'अजमेर शरीफवर चादर चढवली जाते, तेव्हा अंधश्रद्धा नाही का? लोक त्याची प्रगती बघू शकत नाहीत.'

Bageshwar Dham Sarkar :बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. नागपुरात दरबार भरवल्यानंतर त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे. यानंतर अनेकजण पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. सोशल मीडियावरही बाबांच्या समर्थनार्थ नेटीझन्स पोस्ट करत आहेत. यानंतर आता त्यांचे गुरु रामभद्राचार्य (Rambhadracharya) हेदेखील त्यांच्या समर्थनार्थ आले आहेत. माझा शिष्य चारित्र्यहीन नाही, हा एक चमत्कार आहे, असे ते म्हणाले आहेत.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये न्यूज18 शी बोलताना ते म्हणाले की, 'माझा शिष्य परंपरेतून मिळालेला प्रसाद वाटप करतोय. श्याम मानव यांनी अंधश्रद्धेची चुकीची तक्रार केली आहे. अजमेर शरीफवर चादर चढवली जाते, तेव्हा अंधश्रद्धा नाही का? पाखंडी जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात, तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का? हे सत्य आहे, अंधश्रद्धा नाही. माझ्या शिष्याला मिळालेली धमकी चुकीची आहे. त्याच्यावर अन्याय होत आहे. त्याला धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,' अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणतात, 'माझा शिष्य चांगला आहे, कोणत्याही महिलेकडे पाहत नाही, तो चारित्र्यहीन नाही. परंपरेतून मिळालेला प्रसाद वाटप करतोय. त्या बिचाऱ्याने काय चूक केली? लोकांना चांगल्या माणसांची प्रगती पाहवत नाही, म्हणूनच हा वाद निर्माण केला जातोय. तो फक्त 26 वर्षांचा मुलगा आहे, लोक त्याची प्रगती बघू शकत नाहीत. माझ्या प्रेरणेने आज माझा शिष्य सर्व काही करतो आहे. तो काही वाईट करत असता, तर मी त्याला सांगितलं असतं,' असंही ते म्हणाले.

धीरेंद्र यांना जीवे मारण्याची धमकीपंडित धीरेंद्र शास्त्री यांना धमक्या आल्याची माहिती आहे. याप्रकरणी छतरपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. धमक्या मिळाल्याची तक्रार धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांनी केली आहे. बाघेश्वर धाम येथील पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा चुलत भाऊ लोकेश गर्ग याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अमर सिंह नावाच्या व्यक्तीने एका अनोळखी नंबरवरून कॉल करुन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामnagpurनागपूर