बाबा बागेश्वर उभारणार हिंदू गाव, फक्त हिंदूंनाच मिळणार प्रवेश; 1000 कुटुंबाची व्यवस्था...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 22:03 IST2025-04-04T22:03:12+5:302025-04-04T22:03:44+5:30
Bageshwar Dham : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आज देशातील पहिल्या हिंदू गावाचे भुमीपूजन केले.

बाबा बागेश्वर उभारणार हिंदू गाव, फक्त हिंदूंनाच मिळणार प्रवेश; 1000 कुटुंबाची व्यवस्था...
Bageshwar Dham : बागेश्वर धाम पीठाचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशातील पहिल्या हिंदू गावाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. बुधवारी(2 एप्रिल) मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात या गावाच्या उभारणीचे भुमीपूजन पार पडले. या गावात सुमारे एक हजार कुटुंबांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यांची जीवनशैली वैदिक संस्कृतीवर आधारित असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या गावात सुमारे एक हजार कुटुंबांना राहण्यासाठी घरांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या दोन हे गावा तयार होणार आहे. या गावाची खास गोष्ट म्हणजे, येथे फक्त हिंदू लोकच राहतील आणि गावात राहणाऱ्या सर्वांची जीवनशैली आधुनिक पद्धतींवर आधारित नसून, वैदिक संस्कृतीवर आधारित असेल.
बागेश्वर धाम पीठ से हिन्दू राष्ट्र की हुई शुरुवात पूज्य सरकार के पावन संकल्प “हिन्दू ग्राम का हुआ भूमि पूजन” pic.twitter.com/Tj36GluFNh
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) April 2, 2025
बाबा बागेश्वर धाम संकुलात या गावाचा विकास होत आहे. बागेश्वर धाम जनसेवा समिती या गावासाठ जमीन देणार असल्याचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले. याबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, या गावातील घरे कराराच्या आधारे दिली जातील. या हिंदू गावामध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी असेल. हिंदू राष्ट्राचे स्वप्न हिंदूंच्या घरातूनच सुरू होते. भारत हिंदू राष्ट्र कसे होईल, तर हिंदू कुटुंब, हिंदू समाज, हिंदू गाव, हिंदू तहसील, हिंदू जिल्हा आणि हिंदू राज्याच्या निर्माणानंतरच हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण होईल, असे ते म्हणाले.