बॅडमिंटन भारत
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30
सायना, श्रीकांत यांची

बॅडमिंटन भारत
स यना, श्रीकांत यांची विजयी सुरुवातदुबई : भारताची स्टार सायना नेहवाल आणि युवा खेळाडू के. श्रीकांत यांनी बुधवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व सुपर सिरिजच्या अंतिम लीग बॅडमिंटन स्पर्धेत आपापले सामने जिंकले. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायनाने अ गटात विश्व क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील खेळाडू चीनची शिजियान वाँग हिचा ५८ मिनिटांच्या खेळात २१-१७, २१-१७ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला. सायनाचा शिजियानविरुद्ध कारकीर्दीतील हा ११ सामन्यातील सहावा विजय होता. याआधी दोन्ही खेळाडू ५-५ ने बरोबरीत होत्या.पहिल्यांदा या स्पर्धेत खेळणारा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने जपानचा केंतो मोमोतो याच्याविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतरही मुसंडी मारताना एका तासाच्या संघर्षात १५-२१, २१-१६, २१-१० ने पराभूत केले. सायनाला यंदा शिजियानकडून चारपैकी तीन सामन्यात पराभवांचा फटका बसला होता. गेल्या दोन सामन्यात सायना फ्रेंच ओपन आणि डेन्मार्क ओपनमध्ये पराभूत झाली. सायनाने शिजियानवर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय मिळविला खरा; पण त्याआधी ऑल इंग्लंडमध्ये सायनाला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून मात खावी लागली. (वृत्तसंस्था)