पश्चिम बंगालमध्ये ‘बदायूं’ची पुनरावृत्ती?
By Admin | Updated: July 25, 2014 02:39 IST2014-07-25T02:39:20+5:302014-07-25T02:39:20+5:30
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आज गुरुवारी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला़ यानंतर संतप्त गावक:यांनी या प्रकरणातील तीन संशयितांना पकडून त्यांना बेदम मारहाण केली़

पश्चिम बंगालमध्ये ‘बदायूं’ची पुनरावृत्ती?
तमलुक (प़ बंगाल) : पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आज गुरुवारी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला़ यानंतर संतप्त गावक:यांनी या प्रकरणातील तीन संशयितांना पकडून त्यांना बेदम मारहाण केली़ या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल़े या तिघांनीच मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप गावक:यांनी यावेळी केला़
पूर्व मिदनापूर जिल्ह्याच्या कालीबाजार गावात आज सकाळी आठ वर्षाची मुलगी मृतावस्थेत आढळली़ काल (बुधवारी) संध्याकाळी 5 वाजतापासून ती बेपत्ता होती़ कुटुंबातील सदस्य व गावक:यांनी काल रात्रभर तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही़ आज सकाळी मात्र तिच्याच घरापासून 2क्क् कि.मी. अंतरावरील शेतात तिचा मृतदेह आढळला़ यानंतर गावक:यांनी गावातीलच रतन दास व त्याच्या दोन सहका:यांनीच बलात्कार व हत्या केल्याचा आरोप करीत तिघांनाही बेदम चोप दिला़ घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या तिघांची गावक:यांच्या तावडीतून सुटका केली़ मात्र काही क्षणातच रतन दासचा मृत्यू झाला; अन्य दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ (वृत्तसंस्था)