बदायूँत पुन्हा सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: June 16, 2014 04:19 IST2014-06-16T04:19:56+5:302014-06-16T04:19:56+5:30

एक महिला आपल्या दोन मुलांसह बिसौली येथील सोमवार बाजार मोहल्ल्यात भाड्याने राहत आहे

Badad again gang rape | बदायूँत पुन्हा सामूहिक बलात्कार

बदायूँत पुन्हा सामूहिक बलात्कार

बदायूँ : उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील सआदतगंज गावात दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच या जिल्ह्यातील बिसौली गावात शस्त्राचा धाक दाखवून एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले आहे. तीन आरोपींमध्ये एक पोलिसाचा मुलगा आहे.
एक महिला आपल्या दोन मुलांसह बिसौली येथील सोमवार बाजार मोहल्ल्यात भाड्याने राहत आहे. तिचा पती खुनाच्या एका खटल्यात तुरुंगात आहे. शुक्रवार रात्री ही महिला आपल्या दोन्ही मुलांसह औषध घ्यायला गेली होती. तेथे तिला हिमांशू नाव असलेला तरुण भेटला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. महिला हिमांशूला ओळखत होती. हिमांशूचे वडील पोलीस शिपाई आहेत.हिमांशूने दुसरे घर भाड्याने मिळवून देतो, असे सांगून पीडित महिला आणि मुलांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर रात्री उशिरा आपल्या दोन मित्रांसह महिलेवर बलात्कार केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Badad again gang rape