शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

जिओ ग्राहकांसाठी 'बॅड न्यूज'! प्रत्येक महिन्याला महाग होणार टॅरिफ प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 7:20 PM

रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी सुरूवातीला मोफत सेवेचा चांगलाच आनंद घेतला. फ्री अनलिमिटेड इंटरनेट ते फ्री कॉलिंगपर्यंत सर्व सुविधांचा लाभ त्यांनी घेतला.

नवी दिल्ली - रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी सुरूवातीला मोफत सेवेचा चांगलाच आनंद घेतला. फ्री अनलिमिटेड इंटरनेट ते फ्री कॉलिंगपर्यंत सर्व सुविधांचा लाभ त्यांनी घेतला. त्यानंतर अत्यल्प शुल्क आकारून जिओने इंटरनेटची सेवा पुरवली. पण आता चित्र वेगळं आहे, कारण लवकरच जिओचे प्लॅन महागडे होणार आहेत. अमेरिकेतील ब्रोकेज फर्म Goldman Sachs ने याबाबत वृत्त दिलं आहे. 

Goldman Sachs च्या रिपोर्टनुसार, जिओ आपले टॅरिफ प्लॅन दर तीन महिन्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. जानेवारी 2018 मध्ये पुढील दरवाढ होऊ शकते. भविष्यात जिओ 309 रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 49 दिवसांहून 28 दिवस करू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीपासून कंपनीने आपल्या धन धना धन ऑफरची व्हॅलिडीटीही कमी केली आहे.  399 रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांहून 70 दिवस करण्यात आली आहे. आता 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 459 रूपये द्यावे लागतील. याचा सर्वाधिक फायदा जिओची कट्टर प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे.

रिलायन्स जिओने पहिल्यांदा स्वस्त फोन देण्याची योजना जाहीर केली होती. त्यानंतर भारतीय एअरटेलनेही अशीच घोषणा केली. जिओच्या फोनची प्रभावी किंमत १,५00 रुपये, तर एअरटेलच्या फोनची प्रभावी किंमत १,३९९ रुपये आहे. आता व्होडाफोन आणि आयडिया या स्पर्धेत उतरल्या आहेत. या कंपन्या लावा आणि कार्बन या हँडसेट उत्पादक कंपन्यांशी चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत. या वृत्तास लावा आणि कार्बन या कंपन्यांच्या सूत्रांकडून दुजोरा मिळाला आहे. लावाचे उत्पादन प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले की, आम्ही तीनही कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोननोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचे जोरदार रिलाँचिंग केले आहे. याच्या अंतर्गत नोकिया ८ या फ्लॅगशीप स्मार्टफोनसह अन्य काही किफायतशीर मॉडेल्सदेखील सादर करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कधी काळी प्रचंड गाजलेल्या नोकिया ३३१० या मॉडेलची थ्री-जी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येईल असे वृत्त मध्यंतरी आले होते. तथापि, भारतातील फोर-जी नेटवर्कचा वाढता आलेख पाहता नोकिया कंपनी याऐवजी अत्यंत स्वस्त मूल्यात फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा फिचर फोन सादर करण्याची माहिती समोर आली आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीच्या भारतीय विभागाचे उपाध्यक्ष अजय मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जिओफोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आपली कंपनी भारतात अत्यंत किफायतशीर मूल्यात फोर-जी फिचरफोन लाँच करण्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. यात जिओफोनप्रमाणे फोर-जी आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा सपोर्ट असेल. 

BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोनबीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.

टॅग्स :Jioजिओ