बाबासाहेबांना शहरात आदरांजली
By Admin | Updated: May 16, 2014 23:43 IST2014-05-16T23:43:32+5:302014-05-16T23:43:33+5:30
अकोला। दि. 6 ( प्रतिनिधी)

बाबासाहेबांना शहरात आदरांजली
अकोला। दि. 6 ( प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज, 6 डिसेंबरला शहरात ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्थाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
र्शावस्ती बुद्ध विहार- म. फुले नगरस्थित र्शावस्ती बुद्ध विहारात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव वाकोडे होते. यावेळी जे. पी. मोरे, समाधान खंडारे, विजय इंगळे, अनिल करवते, विश्वनाथ वाकोडे, सदाशिव सिरसाट, एकनाथ तायडे, विजय वाकोडे, राजीव मोरे, सुरेश सुरवाडे, कुणाल मेंढे, विलास पचांग, उत्तमराव हिवराळे, वेणुताई खंडारे, इंदिराबाई वाकोडे, रमाबाई अरखराव, सुशीलाबाई कोकरे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ- राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अशोक वाटिकेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामाभाऊ उंबरकर, गजानन भटकर, आशाताई चंदन, लिनाताई चिम, सुनील गवई, बाळकृष्ण डांगे, अनिल उंबरकर, नंदू ढाकरे, गोपाल भटकर, विनोद इंगळे, गजानन उंबरकर, दिनेश बसेरे, सोनू लोंढे, गजानन बेलुलकर, सारंग भावसार, शुभम शेगोकार, योगेश इंगळे, संतोष उंबरकर, निलेश बोरकर, पुंडलिक उंबरकर, शंकर ढबाले, प्रशांत इंगळे, शशिकांत देविकर, किशोर चोपडे, रमेश राजूरकर, शिवलाल इंगळे आदींची उपस्थिती होती, असे मारोती उंबरकर यांनी कळविले.
राष्ट्रवादी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाबासाहेबांना अशोक वाटिका व पक्ष कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, माजी जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे, आयोजक प्रतिभा अवचार, प्रा. विजय उजवणे, प्रभाकर गावंडे, संगीता तायडे, सरला वर्घट, प्रा. सर्फराज खान, रुपाली वाकोडे, पी. एल. सिरसाट, लता वर्मा, शैलेश राठोड, जॉन्सन वर्घट, राजेश लाखे, शैलेश बोदडे, आनंद तेलगोटे, अनुराधा तायडे, शिला ढोके, शिला आठवले, आशा मानकर, रेखा जाधव आदींची उपस्थिती होती.
सिद्धार्थ वाडी - वाशिम बायपासरोडस्थित सिद्धार्थवाडीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शत्रुघ्न मुंडे, अंकिताबाई मुंडे, मुरलीधर इंगळे, सिद्धार्थ मुंडे, सुनील आठवले, रमेश खंडारे, प्रकाश घुमरे, गजानन इंगळे, लक्ष्मण इंगळे, लताबाई मदुंगे, गौतमी खंडारे, संध्या आठवले, फुलाबाई इंगळे, सोनाबाई मुंडे, गवळण साळवे, पद्मा तायडे, कुसुमबाई वाघमारे, मुजाबाई उपर्वट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटबंधारे बहुजन कर्मचारी संघटना- पाटबंधारे बहुजन कर्मचारी संघटनेचा अभिवादन कार्यक्रम जिल्हा परिषद विर्शामगृहात पार पडला. कार्यक्रमाला आ. हरिदास भदे, सभापती नंदाताई घावट, जिप सदस्य अशोक सिरसाट, शाखा अभियंता बारड, अँड. चंद्रकांत वानखडे, मनोज तायडे, गजाननराव भटकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. पी. इंगळे होते. संचालन जिल्हा संघटक विलास भामोद्रे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र अरखराव यांनी केले. आभार कार्याध्यक्ष चंद्रकांत थुंकेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र तायडे, सलीम पांडे, आखतकर, मो. रफीम, शैलेश देशमुख, चंद्रकांत गोपनारायण, किसन सराटे, मनीष देशमुख, कंकाळ, महादेव खाडे, नवले, आखरे, विजय धकीते, संजय सुतवणे, अजाबराव पवार, मांडवगडे, सुनील हातोये, अशोक वाघमारे, सुगतानंद वानखडे, चंद्रकांत उईके, नाना फंड यांनी पर्शिम घेतले.
सामाजिक समरसता मंच - सामाजिक समरसता मंचातर्फे अशोक वाटिकेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सारंग करे, नरेंद्र देशपांडे, रुपेश शहा, लक्ष्मण गोरे, अशोक रामटेके, अरविंद बानाईत आदींची उपस्थिती होती.
जि.प. शाळा मलकापूर क्र. 2 - मलकापूरस्थित जि.प. शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकिसन तायडे होते. यावेळी सुदाम गवई, कोकिळा वाठोरे, उज्वला गवई, लता जंजाळ यांची उपस्थिती होती. संचालन जुनगरे तर आभार तायडे यांनी मानले. प्रास्ताविक मुखयाध्यापक उषा संगवई यांनी केले.
जलसंपदा यांत्रिकी विभाग - जलसंपदा यांत्रिकी विभागात बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता प्रकाश धाबे, कास्ट्राईब जलसंपदा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र जंजाळ, अमरावती विभागाचे उपअभियंता ग. वा. इंगळे, भाऊराव त्रिकाणे, एल. बी. पाटील, अशोक शेगोकार, कोरपे, देसले आदींसह कर्मचारी-अधिकार्यांची उपस्थिती होती.
ज्ञानेश्वरी प्राथ. शाळा - डाबकीरोडस्थित ज्ञानेश्वरी प्राथ. शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गायत्री उजाळे होत्या. यावेळी विजय गोपनारायण, ठोंबरे यांची उपस्थिती होती. संचालन रेखा गोपनारायण यांनी केले.
रिपाइं (आठवले) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यावतीने अशोक वाटिकेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डी. गोपनारायण, सुनील अवचार, वंदना वासनिक, प्रा. गजानन खरात, जनार्दन डोंगरे, मनीष खर्चे, नेव्हरकर, ओईंबे आदींची उपस्थिती होती.
शांतीदूत वाचनालय- अशोकनगरातील शांतीदूत वाचनालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला राजेंद्र नंदागवळी, पो. निरीक्षक पी. पी. निघोट, अश्विन सिरसाट, संतोष चिंचोलकर आदींची उपस्थिती होती.
विद्युत कामगार पतसंस्था-चतुर्थर्शेणी विद्युत कामगार सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष जावेद खान मेहमुद खान, रमेश ओळंबे, विनोद देशमुख, महादेव गुजरे यांनी विचार व्यक्त केले. संचालन सुनील गवई यांनी केले.
डॉ. आंबेडकर वाचनालय-अशोकनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक रामटेके, आशा रामटेके, दीपा महाजन, जया रामटेके, अल्का रामटेके, सिद्धार्थ महाजन, शुभम रामटेके, अनिल महाजन यांची उपस्थिती होती.
सवरेपचार रुग्णालय-जिल्हा शासकीय सवरेपचार रुग्णालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डी. एम. हाताळकर, दादासाहेब लिंगायत, शैलेंद्र लंकेश्वर, बिंबीसार क्षीरसागर,सुभाष सपकाळ यांची उपस्थिती होती.
महाराणा प्रताप विद्यालय-महाराणा प्रताप विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ईश्वरसिंह राजपूत होते. यावेळी संदीप गावंडे, रत्नमाला बुडखले, प्रमोद जामणिक, बादलसिंह मुराडे, शेखर बिरले, अमोल तडस आदींची उपस्थिती होती.
भाजपा-भारतीय जनता पार्टीतर्फे अशोक वाटिकेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक ओळंबे होते. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, सुनील कांबळे, डॉ.युवराज देशमुख, विजय इंगळे, राजेश्वरी अम्मा, गिरीश गोखले, सुमनताई गावंडे, हिरालाल कृपलानी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर विचार मंच-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. गोपनारायण होते. यावेळी हाताळकर, आ. की. सोनोने, र्शीकृष्ण वानखडे, अरुण सिरसाट, बाबूराव गवई, समाधान सदार,तायडे, वाकोडे आदी उपस्थित होते.
मनपा कोंडवाडा विभाग-महानगरपालिका कोंडवाडा विभागातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निरीक्षक अशोक सावदेकर, शरद गायकवाड, अनिल खंडारे, चंदू मुळे, देवानंद वानखडे, नीळकंठ खंडारे, दिलीप आखरे आदींची उपस्थिती होती.
चैतन्य शिक्षण संस्था-न्यू हिंगणा येथील चैतन्य शिक्षण संस्थेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महादेव अहिर, सुरेश गवई, पांडुरंग तायडे, प्रदीप वानखडे आदींची उपस्थिती होती.
काँग्रेस सेवादल -अकोला शहर, जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बी. जी. डोंगरे होते. यावेळी महादेवराव हुरपडे, जितेंद्र बगाटे, तश्वर पटेल, आशाताई चंदन, महादेवराव सिरसाट, डॉ. मनोहरराव दांदळे, शिवाजीराव खरात, भीमराव वानखडे, सचिन शेजव यांची उपस्थिती होती.