शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev : 'देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो'- बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:13 IST

'वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांकडून मला ज्ञान मिळाले, ते मी इतरांना दिले.'

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी देशासह विदेशातही आपला व्यवसाय करते. यामुळे बाबा रामदेव यांच्यावर अनेकदा योगगुरू नसून, बिझनेसमॅन असल्याचा आरोप लागत असतो. यावर आता स्वतः रामदेव स्वष्ट बोलले आहेत. साहित्य आजतकच्या मंचावर त्यांनी स्पष्टपमे सांगितले की, त्यांनी देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता, तर आज ते उद्योगपती इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत झाले असते.

यावेळी आपल्या जुन्या विधानाचा संदर्भ देत बाबा रामदेव म्हणाले की, 'मी एकदा म्हटले होते की, टाटा बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, इलॉन मस्क, वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा स्वामी रामदेवची वेळ महत्वाची आहे. ते सर्व स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी सर्वांसाठी जगतो. म्हणूनच माझा वेळ, शक्ती आणि ज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मला मिळालेले ज्ञान मी संशोधन करून सर्वांसमोर ठेवले.' 

...तर इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत झालो असतोइलॉन मस्कचा संदर्भ देत योगगुरू म्हणाले की, 'मस्क म्हणाले होते, अशी कार बनवू इच्छितो, जी तुम्हाला आकाशात जागा राखून ठेवेन. ते तंत्रज्ञानाबद्दल बोलतात. आपल्याकडे वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांचे ज्ञान आहे, ते ज्ञान जगाच्या कल्याणासाठी दिले. जर मी या बौद्धिक संपत्तीची पेटंट घेतली असती किंवा देशाऐवजी माझ्या व्यवसायावर जास्त लक्ष दिले असते, तर मी इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो अस,' असे ते म्हणाले.

इतिहासाशी छेडछाड... यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचेही म्हटले. रामदेव म्हणाले की, साहित्यात छेडछाड करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनाची नव्हे तर पुनर्व्याख्याची गरज आहे. ज्या प्रकारे भारताचा गौरवशाली भूतकाळ आहे, यामध्ये आम्हाला काही संघर्षांचा सामना करावा लागला आहे. भारत 1000 वर्षे गुलाम होता, हे आपण 200 वर्षांपासून वाचत आहोत. पण, भारत गुलाम नव्हता, तो संघर्ष करत होता. आम्ही मुघल किंवा इंग्रजांची सत्ता कधीच मान्य केली नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाbusinessव्यवसायIndiaभारतelon muskएलन रीव्ह मस्क