शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

B. S. Yediyurappa : नेतृत्वाने सांगितल्यास मुख्यमंत्रीपद सोडू, येडीयुरप्पा यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 06:19 IST

B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठळक मुद्देकर्नाटक भाजपमध्ये उफाळून आलेला असंतोष तसेच राज्यातील कोरोना स्थितीत सुधारणा न होणे या समस्यांचा येडीयुरप्पांना सध्या सामना करावा लागत आहे. 

बंगळुरू : भाजपचे केंद्रीय नेते सांगतील तेव्हा मी मुख्यमंत्रीपद सोडेन. ते राजीनामा द्या असे सांगत नाहीत तोपर्यंत मी या पदावर आहे. राजीनामा द्यावा लागला तरीही मी काम करत राहीन असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रविवारी सांगितले.

येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली तरी त्यानंतरही मी राज्याच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे सुरूच ठेवणार आहे. जनतेच्या कल्याणासाठी मी सातत्याने झटत आहे. मला या पदावर यापुढील काळात ठेवायचे की नाही याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेईल.

मस्की विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा अगदीच कमी मतांच्या फरकाने विजय मिळाला. या गोष्टींचे खापर येडीयुरप्पांच्या नेतृत्वावर फोडण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येडीयुरप्पा यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संबंध ताणले गेले आहेत. कर्नाटक भाजपमध्ये उफाळून आलेला असंतोष तसेच राज्यातील कोरोना स्थितीत सुधारणा न होणे या समस्यांचा येडीयुरप्पांना सध्या सामना करावा लागत आहे. 

काही नेत्यांचा भक्कम पाठिंबाकर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पदावरून हटविण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा सध्यातरी विचार नाही असे या राज्यातील काही भाजप नेतेच सांगत आहेत. उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी सांगितले की, येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. येडीयुरप्पांना भाजपचे सरचिटणीस सी. टी. राव यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण