शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

आझम खानना मोठा धक्का, मुलगा अब्दुल्लाची आमदारकी न्यायालयानं केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:18 IST

समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. न्यायालयानं आझम खान यांचा मुलगा अब्दुल्लाची आमदारकी रद्द ठरवली आहे. निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अब्दुल्ला आझमचं वय निवडणूक लढण्यासाठी पूर्ण नव्हतं, त्यासाठी त्यानं बनावट दस्तावेजाचा वापर केल्याचं उघड झालं आहे.  अब्दुल्लाच्या विरोधात बसपा उमेदवार नवाब काजीम यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, निवडणूक लढताना अब्दुल्ला 25 वर्षांचा नव्हता. अब्दुल्लावर बनावट कागदपत्राद्वारे निवडणूक लढण्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अलाहाबाद न्यायालयानं 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायमूर्ती एसपी केसरवानी यांच्या पीठानं या प्रकरणावर निर्णय दिला आहे. अब्दुल्ला आझम हा समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांचा छोटा मुलगा आहे. 2017मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक अब्दुल्ला लढला होता. अब्दुल्लाने रामपूर क्षेत्रात स्वार विधानसभा जागेवरून निवडणूक जिंकली होती. 2017च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाची हवा होती. अशा वातावरणातही रामपूरमधून आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. अब्दुला आझमनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मी सैनी यांना 50 हजारांहून अधिकच्या मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपाचे उमेदवार नवाब काजीम तिसऱ्या स्थानी होते.जानेवारीमध्ये भाजपा नेते आकाश सक्सेनांच्या तक्रारीनंतर आझम खान यांच्या पूर्ण कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सक्सेना यांनी तक्रारीत अब्दुल्लानं बनावट जन्मदाखला तयार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत अब्दुल्ला खान यांची आमदारकी रद्द केली आहे.